Raosaheb Danve : केंद्र जर कोळसा देत नसेल तर राज्याने परदेशातून कोळसा आणावा; रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला सल्ला
केंद्राकडे पुरेसा कोळसा आहे, पण राज्याने त्याची साठवणूक न केल्याने आज वीजटंचाईची वेळ आल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
जालना: देशात कोळशाची टंचाई नसून केंद्राकडे मुबलक कोळसा आहे. पण राज्य सरकारच्या नियोजन शून्य कारभारामुळे वीज टंचाई होत असल्याचा आरोप रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. आम्ही कोळसा देत नाही असे राज्य म्हणत असेल तर त्यांनी स्वतः बाहेरच्या देशातून कोळसा आणावा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे कोळसा आणि खान मंत्रालयाची जबाबदारी आहे.
वेळीच मुबलक साठा न केल्याने राज्यावर ही परिस्थिती आली असून वीज पुरवण्याची जबाबदारी केंद्राची नसून ती राज्याची असल्याचे देखील रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलंय.ज्या ठिकाणी सरप्लस वीज असेल त्या ठिकाणाहून वीज खरेदी करावी. राज्याला वीज पुरवण्याची जबाबदारी ही राज्याची आहे, केंद्राची नाही. राज्याला कोळसा पुरवण्याची जबाबदारी ही केंद्राची आहे, ती आम्ही केली.पण यांनी ते साठवून ठेवलं नाही असंही रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे.
या काळात राज्यात उष्णतेमुळे अतिरिक्त वीज मागणी असते. ही गोष्ट माहिती असूनही राज्य सरकार बेजबाबदार वागत असल्याचा आरोप रावसाहेब दानवे यांनी केला आहे.
राज ठाकरेंना इलेक्ट्रिक इंजिन भेट दिलं
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी झालेल्या भेटीवर रावसाहेब दानवे म्हणाले की, आपण राज ठाकरे यांना कोळशावरच नाही तर इलेक्ट्रिक इंजिन भेट दिलं आहे. राज ठाकरे हे आमच्या बाजूने बोलले तर विरोधकांच्या पोटात गोळा का येतो? राज ठाकरे हे कसे चिरफाड करतात हे बघा.
महत्त्वाच्या बातम्या:
MNS-BJP : रावसाहेब दानवे यांची अट मनसे मान्य करणार?
रावसाहेब दानवे-राज ठाकरे भेटीनंतर चर्चांना उधाण; दानवेंनी सांगितलं भेटीचं खरं कारण, म्हणाले..
एकनाथ खडसेंनी भाजपमध्ये अनेक वर्ष राहून मनोरंजनच केलं; दानवेंची खरमरीत टीका