एक्स्प्लोर

मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीत गायब, विधानपरिषद निवडणुकीत मात्र हजर, रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या कॅम्पमध्ये दाखल

विधानपपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) हे अखर भाजप (BJP) कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत.

RanjitSingh Mohite Patil : विधानपपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite-Patil) हे अखर भाजप (BJP) कॅम्पमध्ये दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहिते पाटील हे भाजप पक्ष कार्यालयात आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली. यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. माढा लोकसभेबाबत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. मात्र, अखेर ते भाजपच्या कार्यालयात पाहायला मिळाले. 

रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र आहेत. ते सध्या भाजपचे विधनपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही. भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उमेदवारी दिली. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. अखेर धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत मोठ्या मतांनी धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. या संपूर्ण प्रक्रियेत रणजितसिंह मोहिते पाटील शांत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी कोणाचाच प्रचार केला नाही. मात्र. त्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांनी बंधु धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केल्याचंही बोललं जात आहे.

माळशिरस भाजपने रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आणला होता ठराव

रणजितसिंह मोहिते पाटील  यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस (Malshiras) तालुका महायुतीच्या  वतीने करण्यात आला होता. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे घेण्यात आली होती, त्यावेळी ठराव घेम्यात आला होता. भाजपा माळशिरस विधानसभा निवडणुक प्रमुख व भाजपा राज्य कार्यकारणी सदस्य के के पाटील यांनी त्यांच्या राजीनाम्याचा ठराव मांडला. यावेळी आमदार राम सातपुते  (Ram Satpute) उपस्थित होते. 

2019 मध्ये मोहिते पाटलांनी केला होता भाजपमध्ये प्रवेश

एक अभ्यासू, तरुण तडफदार नेतृत्व म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांची ओळख आहे. मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंर मोहिते पाटील यांना विधानपरिषदेरवर पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, यावेळी माढा लोलकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना 1 लाख मताहून अधिक लीड माळशिरस मतदारसंघातून दिलं होतं. निंबाळकरांच्या विजयात मोहिते पाटलांचा मोठा वाटा होता. 

महत्वाच्या बातम्या:

रणजितसिंह मोहिते पाटलांचा राजीनामा घ्या, माळशिरस तालुका महायुतीच्या वतीनं ठराव, राम सातपुतेही उपस्थित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr. Manmohan Singh Passes Away : डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासZero Hour : महिला कुठेच सुरक्षित नाहीत? नराधमांना कायद्याची भीती कधी बसणार?Job Majha | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत प्रशासकीय अधिकारी पदावर भरती ABP MajhaKailash Phad Arrested : बीडमध्ये हवेत फायरिंग करणारा कैलास फड अटकेत, परळी पोलिसांची कारवाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
Manmohan Singh Death : डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
अर्थशास्त्राचे विद्यार्थी ते भारताचे दोन वेळा पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांची कशी झाली जडण घडण 
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
चित्रपट चित्रिकरणाच्या परवानगीसाठी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक खिडकी योजना सुरु करा: मंत्री आशिष शेलारांची सूचना
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
कॅनडामार्गे अमेरिकेत भारतीयांची मानवी तस्करी; 250 हून अधिक कॅनेडियन काॅलेज संशयाच्या भोवऱ्यात; ईडीची छापेमारी
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला; दिग्गज भाजप नेत्यांसमोर घडला प्रकार
ईश्वर-अल्लाह तेरो नाम... भजनावरून गदारोळ, गायिकेला माफी मागावी लागली, 'जय श्री राम'चा नारा द्यावा लागला अन् मगच कार्यक्रम पुन्हा सुरु झाला
Anjali Damani on Dhananjay Munde : हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
हे असले बॉस? अंजली दमानियांचा सर्जिकल स्ट्राईक सुरुच! आता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आणला
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
संजय राऊतांना सांभाळा, नाहीतर ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंमध्येच भांडण लावतील, रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
फडणवीसांच्या मर्जीतील मंत्र्याची वक्रदृष्टी भोवली, राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द, मनीषा खत्री नाशिकच्या नव्या मनपा आयुक्त
Embed widget