(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rang Panchami 2021: रंगपंचमीवरही कोरोनाचे सावट! जाणून घ्या मुहूर्त आणि पूजा विधी
Rang Panchami 2021 Date: रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. यंदा मात्र रंगपंचमीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळं रंगाच्या या उत्सवावर विरजन पडले आहे. होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमीचा सण साजरा केला जातो
Rang Panchami 2021 Date: रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. महाराष्ट्रात खासकरुन रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. यंदा मात्र रंगपंचमीवर कोरोनाचं सावट आहे. कोरोनामुळं रंगाच्या या उत्सवावर विरजन पडले आहे. होळीच्या पाच दिवसानंतर रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. या सणाला देवपंचमी असं देखील म्हटलं जातं. कारण सगळे देव या दिवशी रंगोत्सव साजरा करायचे अशी अख्यायिका आहे. हा सात्विकच्या पूजेचा दिवस आहे. रंगपंचमी धनदायक मानली जाते. महाराष्ट्रामध्ये रंगपंचमीचा उत्सव खेळण्याची परंपरा खूप जुनी आहे, होळीपेक्षा रंगपंचमी खूप उत्साहात साजरी केली जाते.
रंगपंचमीचा मुहूर्त कसा असेल?
शुक्रवार, 2 एप्रिल 2021 रोजी
तिथि प्रारंभ – 10:59 AM on Apr 01, 2021
तिथि समाप्त – 08:15 AM on Apr 02, 2021
यंदा आज चैत्र महिना कृष्ण शुक्रवार 2 एप्रिल 2021 रोजी रंगपंचमी साजरी केली जात आहे. कथांमध्ये असे सांगितलं जातं की, रंगपंचमीवर पवित्र मनाची उपासना केल्यावर देवी-देवता स्वत: भक्तांना प्रसन्न होऊन आशीर्वाद देण्यासाठी येतात. विविध रंगामुळे वाईट गुणांचा नाश होतो.