Ramdas Kadam : तेव्हा दाऊद उघडपणे माझ्याविरोधात होता, रामदास कदमांनी सांगितला 1990 च्या निवडणुकीचा किस्सा
एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी 1990 च्या निवडणुकीचा किस्सा सांगितला.
Ramdas Kadam Majha Katta : 1990 च्या निवडणुकीत माझ्यासमोर जो उमेदवार होता, त्याच्यासोबत दाऊद इब्राहिम उघडपणे काम करत होता. माझ्या मतदारसंघात दाऊदचे गाव आहे. त्यावेळच्या निवडणुकीत दाऊद उघडपणे माझ्या विरोधात काम करत होता, असे वक्तव्य शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी केलं. माझ्या ठिकाणी अन्य कोण असता तर आपला जीव सांभाळून तो पळून गेला असता असेही कदम म्हणाले. तेव्हाची लढाई मी कशी जिंकली हे माझं मला माहित असल्याचं त्यांनी सांगितलं. एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर रामदास कदम आले होते. यावेळी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला शिवसेनेतील प्रवास आणि सध्या सुरु असलेल्या राजकीय स्थितीवर देखील भाष्य केलं. यावेळी त्यांनी 1990 च्या निवडणुकीचा किस्सा सांगितला.
1990 च्या निवडणुकीत केशवराव भोसले माझ्या विरोधात उभे होते. त्यावेळी दाऊद वॉन्टेड नव्हता. 1993 साली बॉम्बस्फोटानंतर तो वॉन्टेड झाला. 1990 च्या निवडणुकीत दाऊदने माझ्या विरोधात उघडपणे लढाई केली. त्याच्या गावात माझी गाडी जाळली गेली. माझ्या लोकांना बांधून त्यावेळी मारलं गेलं. त्यावेळी माझ्या ओळखीचे लोकही तिकडे आले होते. ते कल्याण, डोंबिवली, नाशिकमधून आले होते. त्यामुळं 1990 ला मी रामदास कदम म्हणून आमदार झालो असल्याचे ते म्हणाले.
1995 बाळासाहेबांच्या मनात असूनही मी मंत्री झालो नाही
यावेळी बोलताना रामदास कदम यांनी 1995 ला ज्यावेळी सेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार राज्यात आले, त्यावेळचा किस्सा देखील सांगितला. 1995 साली बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात असतानाही मला मंत्रीपद मिळाले नसल्याचे कदम म्हणाले. ते का मिळाल नाही? हे उद्धव ठाकरेंना विचारा असंही कदम यावेळी म्हणाले. मी याबाबत उघडपणे बोलणार नाही. पण योग्य वेळी नक्की बोलणार असल्याचे कदम यावेली म्हणाले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे बोलावून सांगितले की, तुझं मंत्रीपदाच्या यादीत नाव होते, पण तुझ्यामुळं घरात भांडणं सुरु आहेत. तुला घेऊ नका म्हणून भांडण सुरु आहे, असे बाळासाहेबांनी सांगितल्याचे कदम म्हणाले. फक्त राज ठाकरे यांच्यासोबत होतो म्हणून मला मंत्रीपद मिळालं नाही असेही कदम म्हणाले. पण बाळासाहेबांनी मला मंत्रीमंडळात घेण्याचा शब्द दिला होता असेही कदम म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: