एक्स्प्लोर
पोलीस अधिकाऱ्याची मिरवणूक काढून वाजतगाजत निरोप
पोलीस खात्यात 34 वर्ष सेवा बजवणारे मिर्झा बेग यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले. तिथे पोलीस खात्याची मान उंचवण्याचे काम केले. स्त्री भ्रूण हत्येतील आरोपी सुदाम मुंडे याला गजाआड करण्यात सुद्धा बेग यांचा मोठा वाटा आहे सुदाम मुंडेच्या प्रकरणात बेग यांनी तपासाची चोख भूमिका बजावली.

बीड : सरत्या वर्षाला वाजत गाजत निरोप देत असतानाच बीड जिल्ह्यातील माजलगावमध्ये पोलीस दलातून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्यालासुद्धा अगदी वाजतगाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मिर्झा बेग हे 31 डिसेंबरला सेवेतून निवृत्त झाले. याच दिवशी बेग यांना मिरवणूक काढून वाजतगाजत निरोप देण्यात आला. पोलीस खात्यात 34 वर्ष सेवा बजवणारे मिर्झा बेग यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले. तिथे पोलीस खात्याची मान उंचवण्याचे काम केले. स्त्री भ्रूण हत्येतील आरोपी सुदाम मुंडे याला गजाआड करण्यात सुद्धा बेग यांचा मोठा वाटा आहे. सुदाम मुंडेच्या प्रकरणात बेग यांनी तपासाची चोख भूमिका बजावली होती. बेग यांनी जिथे नोकरी केली तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आणि नागरिकांसोबत सुद्धा चांगला संवाद ठेवला. यामुळे मिर्झा बेग यांच्याबद्दल बीड जिल्ह्यातील लोकांना नेहमीच आपुलकी असायची. म्हणूनच अशा जिंदादिल पोलीस अधिकाऱ्याला निरोप देण्यासाठी माजलगाव शहरातील पोलीस दल हजर होते. वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून या पोलीस अधिकाऱ्याला निरोप देण्यात आला. पोलीस खात्यामध्ये असे दृश्य खूप कमी वेळा पाहायला मिळते. मिर्झा बेग हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील आहेत. मात्र मागच्या बारा वर्षांपासून बीड जिल्ह्यात कार्यरत होते.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















