एक्स्प्लोर

Raju Shetti : चर्चा रेणुका शुगर्सने ऊसाला दिलेल्या सर्वाधिक दराची, पण राजू शेट्टींनी गणित सोडवून सांगितले! इथेनाॅल दरवाढीवरही बोलले

राज्यात एकरकमी एफआरपीसाठी एल्गार सुरु असताना रेणुका शुगर्सने दिलेल्या दराने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी याबाबत गणित सोडवून सांगत संभ्रम दूर केला आहे.

Raju Shetti on Renuka Sugars : राज्यात एकरकमी एफआरपीसाठी एल्गार सुरु असतानाच रेणुका शुगर्सने दिलेल्या दराने चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी याबाबत गणित सोडवून सांगत संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांनी इथेनाॅल दरवाढीवरूनही भूमिका स्पष्ट केली.

राजू शेट्टी म्हणाले की, महाराष्ट्र वगळता देशात सर्वच ठिकाणी ऊसाची वाहतूक आणि तोडणी शेतकरी स्वत: करतो. त्यामुळे केंद्र सरकार तोडणी वाहतुकीसह एफआरपी जाहीर करत असते. उत्तर कर्नाटकात महाराष्ट्राप्रमाणे ऊस तोडणी व वाहतूक साखर कारखाने करतात. मात्र, दक्षिण कर्नाटकात विशेष करून मंड्या, शिमोगा भागात शेतकरी स्वत: करतात. त्यामुळे कर्नाटक तोडणी आणि वाहतुकीसह दर जाहीर करण्याची पद्धत आहे. त्यामुळे रेणुका शुगर्सने जाहीर केलेली एफआरपी जास्त वाटत असली, तरी ती जास्त बसत नाही. तोडणी व वाहतूक वजा केल्यास ती 2800 रुपयापर्यंत बसते. 

इथेनाॅल दरवाढीवर राजू शेट्टी काय म्हणाले?

दरम्यान, राजू शेट्टी यांनी इथेनाॅल दरवाढीवर बोलताना सांगितले की, अजून थोडा दर वाढवून दिला असता, तर साखर उद्योगाला दिलासा मिळाला असता. मात्र, आता फक्त इथेनाॅल दरवाढ करून चालणार नाही, तर बदलत्या काळानुसार एफआरपी दर  ठरवणाऱ्या सुत्रामध्येही बदल करण्याची आवश्यकता आहे. 2011 च्या कायद्यानुसार एफआरपी दर ठरवत असताना केवळ साखरेचा दर आणि उपपदार्थ म्हणजेच बगॅस आणि मोलॅसिसचा दर गृहित धरला गेला. पण या ठिकाणी साखरेचे उत्पादन कमी करून थेट ऊसाच्या रसापासून इथेनाॅल किंवा बी हेव्ही मोलॅसिसपासून इथेनाॅल यामुळे मिळणारे उत्पन केवळ कारखान्यांना मिळत आहे. त्यामुळे खासगी कारखाने मालामाल व्हायला लागले आहेत. ऊस उत्पादकांना त्याचा विशेष फायदा होत नाही. त्यामुळे इथेनाॅलचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी नव्याने सुत्र आखलं पाहिजे. 

दुसरीकडे रेणुका शुगर्सचे कर्नाटक आणि महाराष्ट्रात साखर कारखाने आहेत. साखर उद्योगातील एक मोठे नाव अशी रेणुका शुगर्सची ओळख आहे. कर्नाटकात पाच तर महाराष्ट्रात दोन साखर कारखाने रेणुका शुगर्सचे आहेत. कर्नाटकात अथणी, हावळगा (गुलबर्गा), कोळवी (गोलक), रायबाग आणि मुनोळी येथे तर महाराष्ट्रात इचलकरंजी आणि पाथरी येथे साखर कारखाने आहेत. कर्नाटकात रेणुका शुगर्सने सगळ्यात कमी दर हावळगा (गुलबर्गा) 3325 इतका जाहीर केला आहे, तर मुनोळी येथील कारखान्याने 3660 इतका जाहीर केला आहे. इचलकरंजी येथील पंचगंगा कारखान्याचा दर सर्वाधिक म्हणजे 3925 इतका आहे. रेणुका शुगर्सच्या दरात तोडणी आणि वाहतूक खर्च समाविष्ट आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget