एक्स्प्लोर

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेनं महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाल्याचे मान्य करा; राजू शेट्टींचा प्रहार

राजू शेट्टी म्हणाले की, होय देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले आरोप ऐका.

Raju Shetti on Devendra Fadnavis: देवेंद्रजी तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या वसुली व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होवून उडता पंजाब झाला आहे हे मान्य करा. अजून गावनिहाय, शहरनिहाय कोणत्या गल्लीत काय काय अवैद्य व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. 

देवेंद्रजी हातच्या काकणाला आरसा कशाला? 

राजू शेट्टी यांनी आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग  पोलिसांवर केलेल्या आरोपांच व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, माझे तत्कालीन लोकसभेतील सहकारी आमदार निलेश राणे यांनी अत्यंत वास्तव घटना समाजासमोर मांडली आहे. राज्यात अवैद्य धंद्याना ऊत आलेली आहे हे जळजळीत सत्य सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे. मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो की महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे. या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचे वक्तव्य करून त्याला दुजोरा दिला. 

महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे

राजू शेट्टी म्हणाले की, होय देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले हे आरोप ऐका. एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस जर दोन ते अडीच कोटीची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होवून विचार करा. 

लोकांकडून पोलिस राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत

त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांना माहित आहे अमली पदार्थाची विक्री कोण करतंय, मटका कोण चालवतंय, अवैद्य दारू विक्री कोण करतय, गांजा कोण पुरवत आहे. मात्र या सगळ्या लोकांकडून पोलिस राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत. निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आकडेवारी सांगितली आहे त्यापेक्षा कोल्हापूर, सांगली , पुणे , मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, सोलापूर, ठाणे, नवी मुंबई, नाशिक यासारख्या ठिकाणी तर राजरोसपणे पोलिसांना हप्ते देवून दरमहा शेकडो कोटीची वसुली सुरू असल्याने अवैद्य धंद्याचा महापूर आला आहे. 

तर आधीच टीप देवून सावध केले जाते

त्यांनी म्हटलं आहे की, मटका सुरू ठेवण्यासाठी दरमहा 15 ते 25 हजार , अवैद्य दारूविक्रीसाठी दरमहा 10 ते 15 हजार , अमली पदार्थ विक्रीतून दरमहा 75 हजार ते 1.50 लाख , गांजा विक्रीतून दरमहा 25 ते 50 हजार , अवैद्य लॅाज व्यवसायासाठी दरमहा 10 ते 15 हजार याप्रमाणे पोलिसांचे सरासरी दर ठरले असून ज्यांची विक्री व व्यवसाय जास्त आहेत त्यांचे दर तर गगनाला भिडलेले आहेत. राज्यातील पोलिस दलातील पोलिस ठाण्यातील बीट अंमलदार , पोलिस निरीक्षकपासून ते जिल्हापोलिसप्रमुख कार्यालयातील, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा गुप्तचर शाखेच्या पोलिस निरीक्षकांना सर्व अड्डे माहित आहेत. एखाद्या ठिकाणी पोलिस कारवाई करणार असतील तर कारवाई होण्या आधीच संबंधितांना टीप देवून सावध केले जाते, असा आरोपही त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget