एक्स्प्लोर

आघाडीत बिघाडी, राजू शेट्टींकडून चौथ्या आघाडीची तयारी!

उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती आणि दीड पट हमीभाव विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानी, भारिप, शेकापसारख्या पक्षांना काँग्रेस -राष्ट्रवादी गृहीत धरत असल्याची भावना आहे.

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होण्याआधीच काडीमोड होण्याची शक्यता आहे. कारण छोट्या पक्षांना घेऊन स्वाभिमानीचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी चौथ्या आघाडीची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची चर्चा फिसकटण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस - राष्ट्रवादी विरहीत नवी आघाडी उभी करण्याचे राजू शेट्टी यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हातकणंगले, बुलढाणा, कोल्हापूर, सांगली, वर्धा, धुळे, नंदुरबार, माढासह अजून 5 ते 6 जिल्ह्यांत उमेदवार स्वाभिमानीच्या संपर्कात आहेत. यामुळे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर विविध पक्षातील नेत्यांशी गाठीभेटी घेत असून ते दोन दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून आहेत. छोट्या घटकांना एकत्र घेऊन चौथ्या आघाडीचा पर्याय देण्याच्या हालचाली सुरू खा. राजू शेट्टींनी सुरु केली असल्याची माहिती आहे. इतर पक्षातील तिकीट कापलेल्या बंडखोर उमेदवारांना स्वाभिमानी पक्षाकडून उमेदवारी देण्याची रणनीती आहे. उसाच्या थकीत एफआरपीचा मुद्दा, कर्जमुक्ती आणि दीड पट हमीभाव विधेयकं मंजूर करून घेण्याबाबत काँग्रेस राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानी, भारिप, शेकापसारख्या पक्षांना काँग्रेस -राष्ट्रवादी गृहीत धरत असल्याची भावना आहे. स्वाभिमानी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जागावाटपाच्या चर्चेत बुलढाण्याच्या जागेवरून घोडं अडलं आहे, माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांची राष्ट्रवादीने बुलढण्यातून उमेदवारी जाहीर केल्याने स्वाभिमानीला मोठा धक्का बसला आहे. या जागेवर प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या नावावर स्वाभिमानीकडून शिक्कामोर्तब केलेले आहे. तर वर्ध्यातली जागा माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहितेंसाठी सोडण्याची स्वाभिमानीची मागणी होती मात्र काँग्रेसकडून चारुलता टोकसची उमेदवारी जाहीर करून स्वाभिमानीचा पत्ता कट केला आहे. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना नाराज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंनी वाहिली आजीला श्रद्धांजली, दोन दिवस हिंगोलीतच थांबणार
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Abhijeet Dipke: आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
आजीला शेवटचं पाहता आलं नाही, चितेपाशी जाताच अभिजीत दिपके ढसाढसा रडायला लागले
Abhishek Sharma World Record : अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
अभिषेक शर्माचं वादळ आलं अन् सूर्याचा विक्रम वाहून गेला! टी-20 क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम
Chanakya Niti: कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
कधी बोलावं? कधी शांत राहावे? चाणक्यनीतीचे 6 तत्त्व जाणून घ्या, जी तुमच्या उपयोगी येतील...
Nagpur Election 2026: अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
अनिल सोलेंचा बंडाचा झेंडा कायम, नागपुरात भाजपची धाकधूक वाढली? मुख्यमंत्र्यांसह भाजपच्या बड्या नेत्यांची आज कोराडीत महत्वाची बैठक
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget