गोध्रा हत्याकांड करणारे पोलिस संरक्षणात देशभर उजळ माथ्याने फिरत आहेत आणि दिवस-दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना त्रास; राजू शेट्टींचा पोलिसांवर हल्लाबोल
Raju Shetti: गोध्रा हत्याकांड करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत आणि चळवळीतील शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहेत या पोलिसांच्या उलट्या बोंबा आहेत.

Raju Shetti: स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरू असलेल्या कार्यकर्ते, शेतकऱ्यांच्या धरपकडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सडकून प्रहार केला आहे. पोलिसांच्या ह्या उलट्या बोंबा असल्याचा हल्लाबोलही शेट्टी यांनी केला आहे.राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, गोध्रा हत्याकांड करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत आणि चळवळीतील शेतकऱ्यांना कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहेत या पोलिसांच्या उलट्या बोंबा आहेत.
राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या कार्यकर्त्यांवर जणू काही चोर दरोडेखोर खंडणी बहाद्दर यांच्याप्रमाणे पोलिसांमार्फत प्रतिबंधात्मक कारवाई करून दिवस दिवसभर चळवळीतील शेतकऱ्यांना व कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. मटका जुगार दारू, अवैधंदे यांच्याकडून हप्ते गोळा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही काचेच्या घरात राहत आहात, लक्षात ठेवा असा गर्भित इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.
कोल्हापुरात निवडणुकीसाठी लगभग
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील दहा नगरपालिका व तीन नगरपंचायतींसाठी अखेरच्या दिवशी सोमवारी सदस्यपदासाठी 641 इतक्या तर नगराध्यक्ष पदासाठी 73 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसापर्यंत 263 सदस्यांसाठी 1 हजार 867 इतक्या जणांनी तर 13 नगराध्यक्षांसाठी 169 जणांनी अर्ज दाखल केले. शुक्रवारी 21 तारखेपर्यंत माघार घेता येईल. गडहिंग्लज आणि हातकणंगलेत नगराध्यक्षपदासाठी सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज भरला आहे. जिल्ह्यातील 10 नगरपालिका व 3 नगरपंचायतींच्या निवडणुकीत सदस्यपदासाठी व अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास 10 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली होती. सोमवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस होता त्यामुळे इच्छुकांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरले.
इतर महत्वाच्या बातम्या























