(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhanparishad Election : मनसेचा एक आमदार महायुतीचं गणित बिघडवणार, राजू पाटील नेमकं काय म्हणाले?
Raju Patil on Vidhan Parishad election: राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसे विधानपरिषद निवडणुकीत कोणाच्या बाजूने हे कळेल, मी यावेळी तथस्थ राहणार नाही, मतदान तर करावंच लागेल असे आमदार राजू पाटील म्हणाले.
Raju Patil on Vidhan Parishad election: राज्यात उद्यावर येऊन ठेपलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Maharashtra Legislative Council Election) मनसेचा पाठिंबा नेमका कुणाला याविषयी मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचा (Raj Thakeray) आदेशाची वाट पहात असून मी मतदान करणार आहे आणि तटस्थ राहणार नाही असे आमदार राजू पाटील म्हणाले. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. यासाठी आपापल्या पक्षाच्या आमदारांना फाटाफूट टाळण्यासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. दरम्यान कुठल्या पक्षाचे मत कोणाच्या बाजूने असणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार..
विधान परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा महायुतीला की महाविकास आघाडीला? या प्रश्नावर मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधान परिषदेसाठी महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा देईल.
राज ठाकरेंच्या आदेशाची प्रतीक्षा
राज ठाकरे यांनी अजून कुठलाही आदेश मला दिलेला नाही, आज किंवा उद्या मध्ये त्यांचा तसा आदेश मिळेल तसं मनसेचा पाठिंबा कोणाला द्यायचा हे ठरेल. असेही मनसे नेते राजू पाटील म्हणाले.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाप्रमाणे जर राज ठाकरे यांचा आदेश कोणाला पाठिंबा द्यायचा या संदर्भात आला नाही तर माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटेल अशा पक्षाला माझं मत देईन. असे आमदार राजू पाटील म्हणाले. मतदान तर मी करणार आहे. मी तटस्थ राहणार नाही. मतदान तर करावंच लागणार अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.
विधानपिरषदेत क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता
आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत(Maharashtra Legislative Council Election)क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत आपला विजय व्हावा, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट टाळण्याकरिता आमदारांची बडदास्त ठेवण्यात आलेल्या पंचतारांकित हॉटेलमधील खोल्यांचे भाडे सध्या 15 ते 25 हजारांच्या दरम्यान आहे. त्यामुळे एवढा खर्च कोण करणार?, असा सवाल उपस्थित होत आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. 12 जुलैला विधान परिषदेसाठी विधीमंडळात मतदान पार पडणार आहे. गुप्त पद्धतीने मतदान असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंगची शक्यता, कोणत्या पक्षाच्या आमदारांचे कुठल्या हॉटेलवर मुक्काम?