जिजाऊंचा जन्मोत्सव चार दिवसांवर; जन्मस्थळ असलेला राजवाडा मात्र अजूनही अंधारातच
चार दिवासांवर आलेल्या जिजाऊ जन्म उत्सवासाठी महाराष्ट्राची अस्मिता असलेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेला राजवाडा अद्याप बंदच आहे.
बुलढाणा : महाराष्ट्रातील लाखो मावळ्यांचे श्रद्धास्थान तसेच राज्याची अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचे सिंदखेड राजा येथील जन्मस्थळ आज अंधारात दिसून आले. विशेष म्हणजे चार दिवासांवर म्हणजेच 12 जानेवारीला जिजाऊंचा जन्मसोहळा असून यावर कोरोनाचे सावट आहे. कमी लोकांमध्ये सोहळा पार पाडण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे यासाठी अनेक मान्यवर येणार आहेत. ऐतिहासिक स्थळ म्हणून घोषित झालेले जिजाऊ जन्मस्थान पुरातत्व विभागाच्या देखरेखी खाली आहे.
चार दिवासांवर आलेल्या जिजाऊ जन्म उत्सवासाठी महाराष्ट्राची अस्मिता असलेला बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊंचा जन्मस्थळ असलेला राजवाडा अद्याप बंदच आहे. एवढंच नाहीतर या वाड्यात रात्री अंधारात बघायला मिळत आहे. कोरोनामुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये सरकारनं आध्यात्मिक स्थळ, पर्यटन स्थळ पर्यटकांसाठी उघडली आहेत. मात्र कोरोनाच्या नावाने बंद केलेली ऐतिहासिक स्थळं अजूनही बंदच असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. राजमाता जिजाऊ जयंती निमित्त जन्मस्थळ असलेल्या राजवाडा गेल्या मार्च पासून अंधारात तर दुसरीकडे जिजाऊ यांच्या नावाने साजरा होणाऱ्या उत्सवाचे स्थान दोन किलोमीटर वरील जिजाऊ सृष्टि वर मात्र मराठा सेवा संघाने मोठी लखलखाट विद्युत रोशनाई करण्यात आली आहे.
येत्या 12 तारखेला राजमाता जिजाऊंचा जन्म उत्सव आहे. जिजाऊंच्या जन्मस्थळी म्हणजेच, बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेड राजा येथे मराठा सेवा संघातर्फे सर्वात मोठा उत्सव दरवर्षी साजरा होत असतो. पण यावर्षी कोरोनामुळे हा सोहळा छोटेखानी कार्यक्रमात होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. असं असलं तरी या कार्यक्रमात मराठा सेवा संघातर्फे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कारा यावर्षी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सिंदखेड राजा येथील कार्यक्रम स्थळ जिजाऊ श्रुष्टी आतापासून दिव्यांच्या झगमागाटात सजविली गेली आहे. पंरतु जवळच असलेलं जिजाऊंचं मुळ जन्मस्थळ अजूनही अंधारात आणि कुलुपबंद स्तिथित आहे. सध्या हा राजवाडा पुरातत्व विभागाच्या देखरेखीत आहे. पण जिजाऊंच्या जन्म सोहळ्यासाठी या परिसराची साधी साफसफाई किंवा एखादा दिवा सुद्धा लावण्याचं कार्य पुरातत्व विभागाने दाखविलं नाही. एकीकडे झगमगाट तर मुळ जन्मस्थळ अंधारात अशी काहीशी स्थिति रात्री बघवायास मिळाली आहे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या नावावर निवडणुकांचे प्रचार केले जातात. बऱ्याचदा यांच्या नावाचा उपयोग राजकारणासाठी सऱ्हास केल्याचं पाहायला मिळतं. पण त्याच अस्मितेचा राज्यकर्त्यांना कालांतराने विसर पडल्याचं पाहायला मिळतं. कोरानाचे निर्बंध फक्त जिजाऊ जन्मस्थळालाच का, जिजाऊ सृष्टिला नियम नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.