एक्स्प्लोर

जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढली : राज ठाकरे

जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढत असल्याचं मत राज ठाकरेंनी नोंदवलं. सांगलीत पार पडलेल्या पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात ते बोलत होते.

सांगली : आजचे साहित्यिक सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर ठोस भूमिका घेत नाहीत, अशी थेट टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. सांगलीत पार पडलेल्या पद्मश्री कवी सुधांशू अमृतमहोत्सवी साहित्य संमेलनात ते बोलत होते.  जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यात जातीय तेढ वाढत असल्याचं मतही त्यांनी यावेळी नोंदवलं. राज्यातली शहरं बळकावली जात आहेत आणि आपआपल्या जाती, धर्माचे मतदारसंघ बळकट केले जात आहेत. पण महाराष्ट्रातली जनता सध्या बेसावध असल्याची भूमिका राज ठाकरेंनी मांडली. कोरेगाव-भीमा हिंसाचाराचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात जे घडत आहेत, त्यावर लिहिण्याचे धाडस लेखक करत नाहीत. जातीपातीच्या राजकारणामुळे राज्यातली सामाजिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे या सगळ्या जातीय भिंती पाडा, आणि महाराष्ट्रवर जी संकटे येत आहेत, त्याला सामोरे जाण्यास तयार राहा" अशी सूचनाही राज ठाकरेंनी यावेळी दिली. विशेष म्हणजे, कमला मिल्स अग्नितांडव प्रकरणावरुनही राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. “कमला मिल्स अग्नितांडवात मृत्युमुखी पडलेले फक्त गुजराती समाजाचे होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्यांच्यासाठी ट्वीट करुन शोक व्यक्त केला. वास्तविक, पंतप्रधान आता फक्त गुजरातचे नाहीत हे त्यांनी ध्यानात घ्यावं,” असा खोचक टोला राज ठाकरेंनी हाणला. भाजप सरकारच्या कारभाराचाही राज ठाकरेंनी यावेळी चांगलाच समाचार घेतला. “राज्यात शेतकरी आत्महत्यावर कुणी काही बोलत नाही. महाराष्ट्र नोकऱ्या आहेत, पण त्याही परप्रांतीय नोकऱ्या घेऊन जात आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनीही मुंबई-बडोदा रस्त्यासाठी काही कोटी रुपये देण्याचं जाहीर केलं. पण त्यांना महाराष्ट्र दिसला नाही.” असं राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, राज ठाकरेंनी आपल्या सांगली दौऱ्यात पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या कुटुंबियांची भेट घेऊन, त्यांचं सांत्वन केलं. यावेळी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस उपाधिक्षक दीपाली काळे यांच्यावर कारवाईसाठी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी कोथळे कुटुंबियांनी राज ठाकरेंकडे केली.

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget