Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) लवकरच आजोबा होणार आहेत. अमित ठाकरे (Amit Thackeray) आणि मिताली ठाकरे (Mitali Thackeray) यांच्याकडे 'गुडन्यूज' असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर नवा पाहुणा येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


शिवतीर्थवर सध्या नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे उत्सुक आहेत. सध्या ठाकरे कुटुंबात आनंदीआनंद आहे. ठाकरे कुटुंबातील पुढच्या पिढीच्या स्वागताला संपूर्ण ठाकरे कुटुंबीय इच्छूक आहे. 


मिताली ठाकरेंचे सासर आणि माहेर मुंबई असल्याने बाळाचा जन्मदेखील मुंबईत होणार आहे. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे 27 जानेवारी 2019 रोजी लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग तसेच सिनेक्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.


मराठी भाषा गौरव दिनादिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोठी घोषणा केली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. अमित ठाकरे यांची  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून अमित ठाकरे  मनसेत सक्रिय झाले आहेत. विद्यार्थी व तरुणांचे प्रश्न ते पक्षाच्या माध्यमातून मांडत असतात.


संबंधित बातम्या


Indian Student Died : युक्रेनमध्ये बॉम्ब हल्ल्यात मृत भारतीय विद्यार्थ्याच्या वडिलांना पंतप्रधान मोदींचा फोन


'अक्षय चैतन्य'चे मुंबईत महास्वयंपाकघर, दररोज 25 हजार गरजूंना मोफत जेवण देणार


Clean OTT : महिलांना समर्पित जगातील एकमेव  OTT प्लॅटफॉर्म होणार लॉंच! जाणून घ्या


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha