Clean OTT : OTT ची लोकप्रियता पाहता हल्ली अनेक चित्रपट हे चित्रपटगृहांऐवजी OTT Apps किंवा OTT प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित (Release) होऊ लागले आहेत. अशातच जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर वर्ष 2023 मध्ये महिलांना समर्पित जगातील एकमेव OTT स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लॉंच होणार आहे, जगात प्रथमच असा प्रयोग करण्यात आला आहे, जाणून घ्या सविस्तर
महिला कलाकार, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कंटेटचा समावेश
द्योजक कर्णेश शर्मा यांनी क्लीन ओटीटीची निर्मिती केली आहे. ज्याचे अॅमेझॉन प्राइम आणि नेटफ्लिक्ससोबत टाय-अप करण्यात आले आहे. प्रॉडक्शन कंपनी क्लीन स्लेट फिल्मझसाठी तब्बल $54 मिलियन कराराची घोषणा करण्यात आली आहे. याच्या माध्यमातून आशा करण्यात येतेय की, महिला कलाकार, दिग्दर्शक आणि उत्कृष्ट कंटेटचा यात समावेश असून हा OTT प्लॅटफॉर्म भारतीय मनोरंजन क्षेत्रात एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल. विविध निर्मात्यांकडून तयार करण्यात आलेल्या कलाकृती भारतात स्टिरियोटाइपला आव्हान देण्यासाठी मध्यवर्ती भूमिका बजावतील.
भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील निर्मात्यांना संधी
OTT प्लॅटफॉर्मच्या कंटेटमध्ये चित्रपट, वेब सिरीज आणि डॉक्यु-सीरीजमधील आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक प्रोजेक्ट्सचा समावेश असेल. त्यामध्ये भारत, बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील इतर निर्मात्यांना संधी देण्यात आली आहे. Clean OTT च्या माध्यमातून विविध अभ्यासू प्रोजेक्ट्समधून दर्शकांचे मनोरंजन करण्यात येणार आहे. क्लीन स्लेट फिल्मझशी संबंधित दिग्दर्शक, पटकथा लेखक, अभिनेते आणि निर्मात्यांच्या अनुभवी टीमच्या माध्यमातून एक उत्कृष्ट संग्रह निर्माण करेल, तसेच नवख्या कलाकारांच्या प्रतिभेला वाव देईल.
जगभरात मोठ्या हजारो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित
गेल्या 3 वर्षात जगभरात कोरोना या रोगाने थैमान घातले आहेत. गेल्या वर्षभरापासून जगभरातील अनेक देशांनी कोरोनाच्या परिस्थितीनुसार लॉकडाऊन जाहीर केली. अशा परिस्थिती चित्रपटगृह बंद होते. त्यामुळे जगभरात मोठ्या हजारो चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या:
- Russia Ukraine War : एकीकडे अणुयुद्धाची तयारी, दुसरीकडे युक्रेनशी चर्चा; अखेर पुतिन यांची योजना काय?
- Ukraine Russia War : तिसरं महायुद्ध झाल्यास कोणत्या देशाची कोणाला साथ? भारताची भूमिका काय?
- Russia Ukraine War : रशियाकडून युक्रेनमध्ये खतरनाक बॉम्बचा वापर, जाणून घ्या काय आहे व्हॅक्यूम बॉम्ब आणि क्लस्टर बॉम्ब?