Indian Student Died : रशियाने युक्रेनवर (Russia Ukraine) ताबा मिळवण्यासाठी हल्लाबोल केला आहे. रशियाने युद्ध पुकारल्यानंतर मागील सहा दिवसांपासून युक्रेनमध्ये (Ukraine War) विध्वंस पसरला आहे. अनेक सैनिकांसह सामान्यांना जीव गमवावा लागत आहे. अनेक भारतीय नागरिक विशेषत: विद्यार्थी याठिकाणी अडकले आहेत. दरम्यान आज (मंगळवारी) सकाळीच नवीन शेखराप्पा या भारतीय विद्यार्थ्याचा खारकिव्हमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला आहे. दरम्यान यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या वडिलांना फोन केल्याची माहिती एएनआय वृत्तसंस्थेनं दिली आहे.


याशिवाय विदेश मंत्रालयाने ट्वीट करत माहिती दिली आहे की,''आज सकाळी खार्किवमध्ये झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला. याचं आम्हाला दु:ख आहे. मंत्रालय त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे. आम्ही कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो.'' 21 वर्षीय नवीन शेखराप्पा हा मूळचा कर्नाटकातील असून तो एमबीबीएसचा अभ्यास करण्यासाठी युक्रेनमध्ये होता.



खाद्यपदार्थ आणायला गेला आणि...


नवीन हा युक्रेनमधील खारकिव्हमध्ये असून तो खाद्यपदार्थ आणायला गेला असताना रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात त्याला आपला जीव गमवावा लागला. खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी तो जवळच्या एका सुपरमार्केटमधील रांगेत उभा होता. त्याचवेळी रशियाचा एक बॉम्ब काळ म्हणून आला आणि त्यात त्याचा जीव गेला.  


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha