Devendra Fadnavis Meet Raj Thackeray मुंबई: राज्याच्या राजकाराणातील एक महत्वाची आज मुंबईत घडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. वांद्रे येथील ताज लँडस् हॉटेलमध्ये आज (12 जून) या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना मोक्याच्या क्षणी देवेंद्र फडणवीसांनी एन्ट्री मारली आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि मनसे युतीला (MNS-Shivsena UBT Yuti) ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोन्ही बंधूंचे मनोमिलन होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. ठाकरे गट आणि मनसे पक्षातील पहिल्या ते शेवटच्या फळीतील नेते युतीसाठी सकारात्मक होते. त्यामुळे मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी उद्धव आणि राज एकत्र येणार आणि राजकारणात मोठे उलटफेर होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, गेल्या दहा वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व राखून असलेल्या चाणाक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आगामी राजकारणाचे वारे ओळखून योग्यावेळी शिवेसना-मनसे युतीला ब्रेक लावण्यासाठी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी बोलावले असावे का, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावरुन माध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना ठाकरे बंधूंच्या युतीवरुन प्रश्न विचारला होता. यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीवर मी बोलणार नाही. बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना, असं मला व्हायचं नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती.
ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी राज-उद्धव एकत्र येणार?
7 जून रोजी मनसेच्या केंद्रीय समितीची बैठक शिवतीर्थ या राज ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडली. 2014 आणि 2017 या निवडणुकानंतर पुन्हा एकदा 2025 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे ब्रँड टिकवायला मनसेप्रमुख उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र येतील ही चर्चा रंगली आहे. सलग तीन दिवसाच्या चर्चेनंतर मुंबईत राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचे मराठी माणसाचे गळ घालणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे.