महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे सत्तेत आणि विरोधात एकच पक्ष : राज ठाकरे
महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे सत्तेत आणि विरोधात एकच पक्ष आहे. सत्तेतही शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि विरोधातही शिवसेना राष्ट्रवादी, असे राज ठाकरे म्हणाले.
मुंबई : महाराष्ट्रात जो पक्ष सत्तेत तोच पक्ष विरोधात अशी विचित्र आणि घाणेरडी परिस्थिती आहे अशी टीका राज ठाकरेंनी केलीय. अशी स्थिती जगाच्या पाठीवर केवळ महाराष्ट्रात आहे असंही राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या शिबिरात बोलताना राज यांनी ही टीका केली.
पुढल्या वर्षी मुंबईत आणि कोकण पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसंदर्भात आज बैठक आहे. भारत काय इंडिया काय की हिंदुस्तान काय ... एकमेव देश आहे की जिथे अशाप्रकारची लोकशाही आहे. महाराष्ट्रात घाणेरडी परिस्थिती झाली आहे. अर्धे पक्ष सत्तेत अर्धा पक्ष बाहेर आले. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे जिथे सत्तेत आणि विरोधात एकच पक्ष आहे. सत्तेतही शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि विरोधातही शिवसेना राष्ट्रवादी, असे राज ठाकरे म्हणाले.
कोकणात ब्रिज पडला, कोणाचंही लक्ष नाही
मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa National Highway) चिपळूण नजीकच्या बहादुर शेख नाक्याजवळ नव्याने सुरू असलेल्या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळला. राज ठाकरे म्हणाले, कोकणात ब्रिज पडला, कोणाचंही लक्ष नाही आहे. सगळ्या पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करा. मतदानाच्या दिवशी जिवंत राहा झालं की तिकडेच मरा अशी परिस्थिती आहे. किशोर रुपचंदानी त्याला 140 कोटी रुपयाचा फ्लायओव्हर बांधायला दिला आणि तो पडला. चव्हाण म्हणाले एक लेन सुरु करतो, मात्र सगळं फुकट गेलं. लोकांचे जीव जात आहेत मात्र सर्व सुरु आहे. मुंबईतील 980 कोटी रुपयांचं काम त्यालाच दिलं आहे. हजार दोन हजार कोटींची कामं ब्रिज पडलेल्या लोकांना दिली आहे. कायदा नावाची गोष्टच उरलेली नाही भीती नावाची गोष्टच नाही. कडक शासन होणार याची भीती उरली नाही. या सर्वांना एखाद दिवशी चटके बसतील.
देशातील एकमेव देश असेल जिथे अशी लोकशाही चालते फाॅर्मवर लिहिलेलं होतं सही किंवा अंगठा मतदार पदवीधर असला पाहिजे, मात्र उमेदवाराकडे पदवी नसली तरी चालते. उमेदवार शिक्षक असला पाहिजे की नाही ते माहिती नाही पण मतदार शिक्षक असला पाहिजे अजूनही तसंच आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा :