एक्स्प्लोर
युतीसाठी राज ठाकरेंकडून उद्धव यांना 7 वेळा फोन: बाळा नांदगावकर
मुंबई: 'शिवसेनेसोबत युती व्हावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तब्बल 7 वेळा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केले. मात्र दरवेळेस फोनवर उद्धव ठाकरे नाहीत असं सांगितलं गेलं. इतकंच नाही तर आपण ज्यावेळी मातोश्रीवर युतीचा प्रस्ताव घेऊन गेलो, तेव्हाही उद्धव ठाकरेंशी भेट होऊ शकली नाही.' असं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.
मनसेकडून युतीचा कुठलाही प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर मनसेनं तातडीनं पत्रकार परिषद घेऊन उद्धव यांना उत्तर दिलं आहे.
‘मातोश्री’वर जाऊन मी स्वतः शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांना युतीचा प्रस्ताव दिला. पण शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा प्रस्ताव आला नसल्याचं सांगितलं. मग मी मातोश्रीवर गेल्याचं खोटं बोललो का?', असा सवाल मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला आहे.
मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे खोटं बोलले?
मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याबाबत माहिती दिली. छोटा भाऊ म्हणून आम्ही युतीसाठी तयार आहोत. युती झाल्यास आमच्या सध्याच्या जागा आम्हाला द्या बाकी काहीही नको, असा प्रस्ताव मी ‘मातोश्री’वर दिला, असं नांदगावकरांनी सांगितलं.
दरम्यान युतीची वेळ गेलेली नाही, मनसे अजूनही आशावादी आहे. शिवसेना विचार करेल, अशी अपेक्षा बाळा नांदगावकर यांनी व्यक्त केली आहे.
छोटा भाऊ युतीसाठी तयार, अजूनही वेळ गेलेली नाही : नांदगावकर
उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण
युतीसाठी कुठल्याही पक्षाकडून प्रस्ताव आलेला नाही, मात्र कोणाशीही युती करण्याचा विचार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिवसेना-मनसे युतीच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. दहा महापालिका आणि सर्व जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केला. आम्ही पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरत आहोत, असं सांगत संपूर्ण महाराष्ट्र भगवा करण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
संबंधित बातम्या :
मनसेसोबत युती अशक्य, शिवसेनेच्या सूत्रांची माहिती
..तर राज ठाकरे स्वत: ‘मातोश्री’वर जाणार?
दोन्ही ठाकरे बंधू फार काळ वेगळे राहू शकत नाही: विखे-पाटील
राज ठाकरेंचा निरोप घेऊन बाळा नांदगावकर ‘मातोश्री’वर
राज-उद्धव एकत्र आल्यास इतिहास घडेल, मनोहर जोशींना विश्वास
मनसेच्या प्रस्तावाबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील : राऊत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement