एक्स्प्लोर

मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत संततधार; अनेक धरणं ओव्हर फ्लो

मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत संततधार सुरू आहे. परिणामी अनेक जिल्ह्यामधील धरणं भरली असून नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे.

मुंबई : मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. परिणामी अनेक जिल्ह्यातील धरणे भरली असून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे. असे असले तरी अजूनही मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे येथील शेतकरी अजूनही पावसाकडे डोळे लावून बसला आहे. पुणे शहरात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने, शहराला पाणी पुरवठा करणारी चारही धरणांच्या पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 11 हजार 700 क्युसेक पाण्याचा मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रा लगत राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पात्रात 500 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गात वाढ होवू शकते, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. जून आणि जुलैत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे पुणेकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र, मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खडकवासला पूर्ण भरले असून या चार धरणात मिळून 64 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील चार दिवस या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून धरणे भरली तर या भागातील शेतीचाही प्रश्न सुटणार आहे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय कोयना धरण क्षेत्रातीही मागील काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. परिणामी कोयना धरणाचे दरवाजे कधीही उघडले जाऊ शकतात. कोयना धरण प्रशासनाने तसा निर्णय घेतला आहे. कोयना धरण परिसरात पाऊसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कोयना धरणातला पाणीसाठा 80 टीएमसी इतका झाला आहे. तर नीरा खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने निरा नदीवर असलेले वीर धरण हे आज शंभर टक्के भरले असून या धरणातून 1950 क्यूसेस पाणी हे नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाकड़ून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. यंदा पावसाने सुरुवातीच्या काळातच हजेरी लावण्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरण्या केल्या होत्या. मात्र जुलै महिन्यात पावसाने मोठी दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, गेल्या 24 तासांपासून अनेक भागात दमदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने खरिपातील कापूस, ज्वारी उडीद मूग सोयाबीन या सारख्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याने शेतकऱ्याच्या मध्ये समाधान आहे. मात्र, शहरी भागात चाकरमानी आणि हॉकर्सला मात्र या सततच्या पावसाने फटका बसला असल्याने शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून सध्या सरींवर सळी कोसळत आहे. मागच्या आठवडाभरापासून परभणी जिल्ह्यातून दडी मारलेल्या पावसाने कालपासून पुनरागमन केले आहे. काल दिवसभर सर्वत्र सर्वदूर पाऊस झाल्यानंतर आज पहाटेपासूनच जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. यावर्षी पिकांना हवा तसा आणि वेळेवर पाऊस होत असल्याने जिल्ह्यात सर्वत्रच कापुस, सोयाबीन, मुग आदी पीक जोमात आली आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. वाशिम जिल्ह्यात रात्रीपासून हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरू झालाय. Satara Veer Dam | सातारा जिल्ह्यातील वीर धरण 100 टक्के भरलं

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
Maharashtra Live blog updates: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई; पुण्याचं राजकारण तापलं
Maharashtra Live blog updates: अमित शाहांच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांची कारवाई; पुण्याचं राजकारण तापलं

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Congress Bhai Jagtap: दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांच्या नावाने खोटा व्हिडिओ प्रसारित करणं काँग्रेस नेते भाई जगतापांना भोवलं; भाजपच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Kisan Samman Nidhi scheme: किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
किसान सन्मान निधी योजनेला 5 वर्षांची मुदतवाढ; तेल आणि वायू उत्खननासाठी 84 हजार कोटी रुपयांना मंजुरी
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
E-20 पेट्रोलविरोधात आज आम आदमी पार्टीची राष्ट्रीय टाऊन हॉल बैठक; ज्यांची वाहने बंद पडली ते सुद्धा येणार
Embed widget