एक्स्प्लोर
नागपूरमधील मराठा क्रांती मोर्चासाठी विशेष रेल्वे
नवी दिल्ली: नागपूर अधिवेशनादरम्यान निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी विशेष रेल्वे देण्याचे आदेश रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत. 14 डिसेंबरला नागपुरात होणाऱ्या मराठा मोर्चासाठी आयोजकांनी पैसे भरुन स्पेशल ट्रेनची मागणी केली होती. त्यावर रेल्वेमंत्र्यांनी हे आदेश दिले आहेत.
पण दुसरीकडे रेल्वेनं ही मागणी फेटाळून लावल्याचा दावा आयोजकांनी केला होता. त्यानंतर आता खुद्द रेल्वेमंत्र्यांनी याप्रकरणाची दखल घेत रेल्वे विभागाला स्पेशन ट्रेन पुरवण्याचे आदेश दिले आहेत.
वाशिम आणि मुंबई सीएसटी अशा दोन ठिकाणाहून या ट्रेन निघणार असून, त्यासाठी रेल्वेच्या तारखा आणि वेळेचं नियोजनही सुरु झालं आहे.
दरम्यान, राज्यभरातील मराठा समाजाचे मोर्चे अतिशय शांततेच पार पडल्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यासाठी 14 डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी राज्यभरातून मराठा सामाजातील बांधव उपस्थीत राहतील अशी अपेक्षा मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी व्यक्त केली होती. त्यासाठी आयोजकांनी विशेष ट्रेन देण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या
मराठा आरक्षणाला फाटे का फोडता?, मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसला सवाल
94, 95 नव्हे, मी 96 कुळी मराठा, जे करतो, ते पूर्णच : नारायण राणे
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची इच्छाशक्ती आहे का? : नितेश राणे
मराठा आरक्षणासाठी कटिबद्ध : मुख्यमंत्री
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement