एक्स्प्लोर
जाचाला कंटाळून पतीची हत्या, पत्नी पोलिसात शरण
दोन दिवसांपूर्वी यमुनाने पतीची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवला होता.

प्रातिनिधिक फोटो
रायगड : पतीची हत्या करुन पत्नीने त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवल्याची घटना रायगडमध्ये समोर आली आहे. नवऱ्याच्या जाचाला कंटाळल्यामुळे त्याचा जीव घेतल्याचा दावा आरोपी पत्नीने केला आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामधल्या थळमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हरिश्चंद्र कोळी असं मयत पतीचं नाव असून आरोपी पत्नी यमुनाला अटक करण्यात आली आहे.
पती वारंवार छळत असल्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून त्याचा काटा काढल्याचं पत्नी यमुनाने सांगितलं आहे. विशेष म्हणजे काल रात्री पोलिस स्टेशनमध्ये येऊन तिने स्वतः कबुली दिली.
दोन दिवसांपूर्वी यमुनाने पतीची हत्या केली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह खड्ड्यात गाडून ठेवला होता. मात्र अखेर या खुनाला वाचा फुटली.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























