एक्स्प्लोर
Advertisement
शिवशाही-एसटीसह चार वाहनांचा अपघात, 40 जण जखमी
शिवशाही-एसटीसह चार वाहनांच्या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी असून 40 प्रवाशांना दुखापत झाली आहे.
रायगड : अलिबागजवळ शिवशाही आणि एसटी बससह चार वाहनांचा अपघात झाला आहे. अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी असून 40 प्रवाशांना दुखापत झाली आहे.
अलिबाग-पेण मार्गावरील कार्लेखिंडीमध्ये सकाळी नऊ वाजताच्या सुमारास एसटी बस आणि शिवशाही बसची समोरासमोर धडक झाली. अपघातात अलिबागला जाणाऱ्या एसटी बसचा चालक गंभीर जखमी झाला, तर बसमधील 40 प्रवासी जखमी झाले आहेत. बसने एक कार आणि रिक्षालाही धडक दिली.
जखमींना अलिबागमधील सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर गंभीर जखमी असलेल्या एसटी चालकाला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या अपघातामुळे पेण आणि अलिबागकडे जाणारा मार्ग काही काळ ठप्प झाला. अलिबाग आणि पेणकडे जाणारी वाहतूक ही हशिवरेमार्गे वळवण्यात आली.
गेल्या काही दिवसात शिवशाही बसच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे प्रवाशांंमध्ये चिंतेचं वातावरण आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
नाशिक
पुणे
Advertisement