राष्ट्रवादीकडून दळवींना अडकवण्याचा प्रयत्न, अंबादास दानवेंचा बोलविता धनी शोधणार, शिवसेना आक्रमक, दानवेंच्या प्रतिमेचं दहन
अंबादास दानवे यांनी शिवसेना शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल करुन राजकीय बॉम्ब टाकला आहे. यावरुन शिवसेना आक्रमक झाली आहे.
Raigad : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शिवसेना शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांचा एक व्हिडिओ व्हायरल करुन राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. पैशांच्या गड्ड्यांसह आमदार महेंद्र दळवी हे त्या व्हिडिओमध्ये बातचीत करत असल्याचे दिसत होते. यानंतर हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा शिंदे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. त्यानंतर संतापलेल्या शिवसैनिकांनी आज अलिबागमध्ये अंबादास दानवे यांच्या प्रतिमेचे दहन करत निषेध व्यक्त केला. अलिबाग मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबादास दानवे यांच्या विरोधात निदर्शने करत शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.
अलिबागमध्ये आज शिवसेना शिंदे गटाकडून अंबादास दानवे यांच्या विरोधात आमदार महेंद्र दळवी यांचा जो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आज शिवसेना शिंदे गटाकडून दानवे यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. जिल्हाप्रमुख राजा केनी यांच्या नेतृत्वात हा निषेध नोंदविण्यात आला. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी बातचीत करत असताना दळवी यांची हा व्हिडिओ खोटा असल्याचा दावा केला आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये गौप्यस्फोट करण्यासाठी आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी दानवे यांनी हा व्हिडिओ बनवला असल्याचा आरोप केनी यांनी केला आहे. पोलिस मुख्यालयामध्ये जाऊन उद्या अंबादास दानवे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे केनी म्हणाले. आमदार दळवी यांना अडकवण्यासाठी दानवे यांनी खोटा व्हिडिओ बनवला आहे. दानवे यांच्या बोलविता धनी शोधणार असल्याचे ते म्हणाले. आमदार दळवी यांनी नागरपालिका निवडणुकीत केलेली टीका टिप्पणी यामुळे त्यांना अडकवण्यासाठी राष्ट्रवादीने केलेला हा प्रयत्न असल्याची टीका राजा केनी यांनी केली.
थोरवे यांची चौकशी करायला हवी : सुरज चव्हाण
महेंद्र दळवी स्वत: म्हणत आहेत की हा व्हिडिओ खोटा आहे, तरी थोरवे म्हणत आहेत की हा व्हिडिओ तटकरे यांनी दिला आहे. याचा अर्थ असा ही होऊ शकतो थोरवे यांना माहिती आहे की हा व्हिडिओ कुठून आला आहे. थोरवे यांची चौकशी करायला हवी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरज चव्हाण यांनी केली आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे यांनी एक्सवर व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे की, या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही. बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. याबाबत अंबादास दानवे यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला असता ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षातील काही आमदार त्यात दिसत आहेत. मोठ्या नोटांच्या गड्या त्यात दिसून येत आहेत. कोणाच्या आहेत, काय आहेत हे तपासले पाहिजे. मी याबाबत तक्रार करणार आहे. मी यात कोणाचं नाव घेत नाही पण पोलिसांनी हे शोधले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:






















