एक्स्प्लोर

Raigad Pen News : पेणनजीक संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब, चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

Raigad Pen : पेणनजीक (Pen) संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब (Dummy bomb) असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला.

Raigad Pen News Update : मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक (Pen) संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब (Dummy bomb) असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी (10 नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आणि उरण तालुक्यात संशयित बोट सापल्याने गेल्या महिन्यात खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा रायगडमध्ये संशयस्पद वस्तू आढळल्याने खळबळ उडाली होती. मुंबई - गोवा हायवेवरील पेणनजीक संशयास्पद वस्तू आढळली होती. भोगावती नदीच्या पुलाच्या खालच्या बाजूला जिलेटीन सदृश्य कांड्या सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.  काल सायंकाळी भोगावती नदीपात्रात गेलेल्या व्यक्तीला पाण्यामध्ये संशयास्पद वस्तू दिसून आली. या घटनेची पेण पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. त्याशिवाय रायगड पोलीस अधीक्षक, खालापूर, रोहा पोलीस घटनास्थळी दाखल झालं होतं. त्याशिवाय मुंबई आणि रायगड येथील बॉम्ब शोधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते. अखेर संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे.   

संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण

दरम्यान, मुंबई- गोवा हायवेवरील पुलाखाली मिळालेल्या स्फोटक सदृश्य वस्तुमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर, नदीपात्रात आढळलेल्या बॉम्ब सदृश्य वस्तूच्या पडताळणीसाठी रायगड आणि नवी मुंबईतील बॉम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले होते. यावेळी, सुमारे चार तास सुरु राहिलेल्या पडताळणीमध्ये जिलेटीन सदृश्य स्फोटकांच्या सहाय्यानं डमी बॉम्ब बनवण्यात आल्याचे आढळून आले. यावेळी, या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये वायर आणि घड्याळाचा वापर करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. 

आज या परिसरात आणखी तपासणी करण्यात येणार

बॉम्ब सदृश्य वस्तू नदीपात्रात आढळल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यानंतर त्वरीत नवी मुंबई आणि रायगडची पोलिसांची टीम त्या ठिकाणी दाखल झाली. त्यानंतर बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात आल्याची माहिती रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. हा बॉम्ब डमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, आज या परिसरात आणखी तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. नेमक्या या वस्तू कोणी ठेवल्या, या वस्तू ठेवण्यामागं त्याचा काय उद्देश काय होता याचा तपास करत असल्याची माहिती देखील सोमनाथ घार्गे यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Raigad : पेणमध्ये संशयस्पद वस्तू आढळली, मुंबईचं बॉम्बशोधक पथक दाखल, तपास सुरु

 

महत्त्वाच्या बातम्या

कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कारखानदारांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल, थकीत ऊसबिल आणि रिकव्हरी चोरीप्रश्नी राजू शेट्टी आक्रमक; थेट साखर आयुक्तांसोबत महत्त्वाची बैठक
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
कुणबी प्रमाणपत्र घेऊन ओबीसी जागेवर निवडणूक लढवणाऱ्यांना माझं समर्थन नाही; मनोज जरांगे पाटलांचं मोठं वक्तव्य 
Vanrang 2026 Mumbai : दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
दक्षिण मुंबईत घुमला आदिवासी संस्कृतीचा नाद; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 'वनरंग 2026' चे उद्घाटन
Narendra Patil : एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत
एमडींना अण्णासाहेब पाटील महामंडळाचे वाटोळे करण्याची सुपारी; नरेंद्र पाटील यांचा गंभीर आरोप, अध्यक्षपद सोडण्याचे संकेत

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget