एक्स्प्लोर
रोहा एमआयडीसीतील केमिकल कंपनीतील आग आटोक्यात
एमआयडीसी जवळ असलेली रोठखुर्द आणि रोठबुद्रुक ही गावं रिकामी करण्यात आली आहेत

रायगड : रायगड जिल्ह्यात रोहामधील धाटाव एमआयडीसीत लागलेली भीषण आग आटोक्यात आली आहे. अनथिया केमिकल कंपनीच्या युनिट दोनमध्ये ही आग लागली होती.
एमआयडीसीतल्या अग्निशमन दलाच्या गाड्यांशिवाय नागोठणे, महाड आणि रसायनीतून अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चार तासांच्या प्रयत्नांनी ही आग विझवण्यात यश आलं. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही.
आगीमुळे कंपनीतून धुराचे लोट बाहेर पडत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं होतं. सावधगिरी म्हणून एमआयडीसी जवळची रोठखुर्द आणि रोठबुद्रुक ही गावं रिकामी करण्यात आली होती. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. रोहा ते कोलाड हा मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

आणखी वाचा
Advertisement
Advertisement