एक्स्प्लोर

अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू

अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक मधील किन्नर जागीच ठार झाला आहे.

Raigad Accident : अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात ट्रक मधील किन्नर जागीच ठार झाला आहे. अलिबाग वडखळ मार्गावरील धरमतर खाडीजवळ आयशर टेम्पोनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात संदेश कृष्णा तेलगे (वय 35, रा. फणसापूर, ता. अलिबाग) याचा  जागीच मृत्यू झाला आहे. ट्रेलर चालक शिवपूजन बिसेश्वर पासवान राहणार नेरळ रायगड याच्यावर वडखळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

पुण्यात भीषण अपघात, 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू

पुण्यातील कोंढवा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 18 वर्षीय अरिझ शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. क्लाउड 9, आनंदवन परिसरात ही घटना घडली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, टँकरने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातानंतर संबंधित चालकाला ताब्यात घेऊन कालेपाडळ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

लोखंडी रिंग कोसळून बी. टेकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू 

पुण्यातून एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. बास्केटबॉलच्या रिंगला पुश-अप मारताना लोखंडी रिंग कोसळून बी. टेकच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना तळेगावातील इंदुरी परिसरात घडली आहे. विपुल वर्मा असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो उत्तर प्रदेशातील अयोध्येचा रहिवासी होता.

महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट

दरम्यान, या घटनेनंतर महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नेमकी चूक कुणाची याचा तपास सध्या सुरू आहे.

जळगावच्या अमळनेर तालुक्यात पिकअप व्हॅन उलटून अपघात, 11 जण जखमी

जळगावच्या अमळनेर तालुक्यातील जैतपिर गावात पिकअप व्हॅन उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये 11 जण जखमी झाले आहेत. समोरुन ट्रक आल्याने पिकअप व्हॅन वरील चालकाचे नियंत्रण सुटले अन् अचानक व्हॅन उलटून सर्व प्रवाशी खाली कोसळले. चार चाकी वाहन उलटल्यानंतर त्यातील प्रवासी रस्त्यावर पडल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. 

वाहनाच्या मागच्या बाजूस बसलेले आठ ते दहा हजार वाहन उलटल्यानंतर रस्त्यावर पडल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत. पाच जणांना किरकोळ दुखापत झाली असून गंभीर जखमी असलेल्या सहा जणांना धुळ्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget