एक्स्प्लोर

Income Tax Raid : अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून (Income Tax)सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच आहे.

पुणे :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या मालमत्तांवर आयकर विभागाकडून सलग तिसऱ्या दिवशी छापेमारी सुरुच आहे. अजित पवारांच्या सर्वात मोठ्या भगिनी, डॉक्टर रजनी इंदुलकर यांच्या बंगल्यामध्ये आयकर विभागाचे अधिकारी सलग तिसऱ्या दिवशी ठाण मांडून आहेत.  दुसरीकडे नंदुरबारमधील पार्थ पवारांच्या निकटवर्तीयांच्या आयान मल्टीट्रेड एल.एल.पी कारखान्यावर आयकरकडून तपासणी सुरु आहे. कारवाईत अनेक कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याचं बोललं जातंय. यासोबतच अजित पवार यांच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्याची चौकशी आज होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जिथे कारवाई सुरु झाली त्या ठिकाणी आयकर खात्याचे अधिकारी आणि सुरक्षा दलाचे जवान मुक्कामालाच होते. अजित पवारांच्या पुण्यातील दोन बहिणी म्हणजे डॉक्टर रजनी इंदुलकर आणि नीता पाटील यांच्या मालमत्तांवर काल छापे टाकण्यात आले. तसंच अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या मुंबईतल्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयावरही छापेमारी करण्यात आली. 

Sharad Pawar at Solapur : अजितदादांकडे सरकारी पाहुणे आलेले, पाहुण्यांची आपल्याला चिंता नाही; धाडसत्रावर शरद पवारांचं भाष्य

आयकर विभागाने अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि त्यांचे नातेवाईक यांच्या घरातचं ठाण मांडलं आहे. यामध्ये अजित पवार यांच्या तीन बहिणींचा देखील समावेश आहे. मागील दोन दिवसांपासून या बहिणींशी पवार कुटुंबाचा कुठलाही संपर्क देखील झालेला नाही. इकडे नंदुरबारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल सचिन श्रुंगारे संचालक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील आयान मल्टीट्रेड प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्याच्या परिसरात आयकर विभागाचे पथक गेल्या 48 तासांपासून तपासणी करत आहे. संदर्भात या तपासणी संदर्भात कारखाना प्रशासन आणि आयकर विभागाचे अधिकारी काही बोलण्यास तयार नसल्याने कारखान्यात कुठली कारवाई चालू आहे आणि कोणत्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे हे गुलदस्त्यात आहे.

शरद पवार म्हणाले...
शरद पवार यांनी काल बोलताना म्हटलं होतं की, उत्तरप्रदेशाबाबत माझ्यासह सर्वच विरोधकांनी खंबीर भूमिका घेतली, महाराष्ट्र सरकारने मंत्रीमंडळाच्या बैठकीत लखीमपूर घटनेचा निषेध केला. मी स्वत: शेतकऱ्यांवरील या हल्ल्याची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडासोबत केली, त्याचा संताप व राग सत्ताधारी पक्षातील लोकांना आला आहे, त्याची प्रतिक्रीया म्हणूनच महाराष्ट्रात प्राप्तिकर विभागाचे छापासत्र आहे अशी शक्यता नाकारता येत नाही, असं पवार म्हणाले. 

अजित पवार काय म्हणाले 
दरम्यान अजित पवारांनी म्हटलं आहे की, आयटीनं कुठे छापे टाकावेत हा त्यांचा अधिकार आहे. काही शंका असल्यास ते छापे टाकू शकतात. माझ्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी नियमित टॅक्स भरतो. अर्थमंत्री असल्यानं आर्थिक शिस्त कशी राखायची, कुठलाही कर कसा चुकवायचा नाही, टॅक्स कसा भरायचा असतो हे आपल्याला चांगलं माहिती आहे. पण अजित पवारांचे नातेवाईक म्हणून हे छापे टाकले गेले असतील तर राज्यातील जनतेनं याचा जरूर विचार करावा, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्रेकअप झाल्यामुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून तरुणाला मोठा दिलासा
ब्रेकअपमुळे पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, सर्वोच्च न्यायालयाचा तरुणाला मोठा दिलासा
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Embed widget