एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डी वाय पाटील शिक्षणसंस्थेवर आयकर विभागाचा छापा
पिंपरी चिंचवड/कोल्हापूर : पिंपरी चिंचवड आणि कोल्हापुरातील डी वाय पाटील शैक्षणिक संस्थेवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. पिंपरीत 3 ते 4 कार्यालयात आयकर विभागाने सकाळी साडेसातच्या सुमारास धाड टाकली. शिवाय कर्मचाऱ्यांनाही कार्यालयात जाण्यास मज्जाव घालण्यात आला आहे.
पिंपरीत 22 अधिकाऱ्यांनी डी वाय पाटील संस्थेच्या मेडिकल, डेन्टिस्ट, फार्मसी तसंच इंजिनीअरिंग अशा विविध कार्यालयांवर छापा टाकला. यावेळी त्यांच्यासोबत 20 पोलिसही उपस्थित आहेत. आयकर विभागाचे अधिकारी साडेतीन तासांपासून कागदपत्रांचा कसून तपास करत आहेत.
दुसरीकडे कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरातील डी वाय पाटील मेडिकल कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेजवर आयकर विभागाने सकाळी साडेआठच्या सुमारास छापा टाकला आहे.
छाप्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement