एक्स्प्लोर

राधाकृष्ण विखेंनी स्पष्टच सांगितलं, 'आषाढीची पूजा फडणवीसच करतील', तर कर्डीलेंनी तारीखही सांगितली...

महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार होईल असा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे आणि येणाऱ्या आषाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil : 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा भाजपला मिळाला होता, मात्र महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने तयार झालं आणि आज तेच विश्वासघाताची भाषा करत आहेत. त्यांना ते शोभत नाही. त्यामुळे ते आता सत्तेतून पायउतार होतील असा विश्वास राज्यातील जनतेच्या मनात आहे आणि येणाऱ्या आषाढीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील असं भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे यांनी म्हटलं आहे. विधानपरिषदेवर निवड झाल्यानिमित्ताने भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्कार समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राधाकृष्ण विखे म्हणाले की, शिवसेनेचे राज्यातील अस्तित्व हे संपत आहे, एकनाथ शिंदेंच्या रूपाने अतिशय स्वाभिमानी लोक पुढे येत आहे असंही विखे म्हणाले. सोबतच राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजपची केवळ वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या फ्लोअर टेस्टची मागणी करण्यात भाजपकडून उशीर होतोय का?असा प्रश्न विखेंना विचारला असता, महाविकास आघाडीतील दोन गटातील वाद सध्या सुरू आहे, न्यायालयात हे प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत असं त्यांनी म्हटलंय.

शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना आमदार विखे म्हणाले की,संजय राऊत हा काय आता महत्वाचा मुद्दा नाहीये. तो आधीही नव्हता आणि या पुढेही राहणार नाही.

मी तोंड पाहून भविष्य सांगतो- माजी मंत्री कर्डीले 

अनेकजण हात पाहून भविष्य सांगतात पण मी तोंड पाहून भविष्य सांगण्याचे काम करतो. मी सहज कोणताही ठराव करत नाही. विधान परिषदेसाठी राम शिंदे यांच्या नावाचा ठराव करत असताना मला खात्री होती की, राम शिंदे यांना उमेदवारी मिळेल म्हणूनच मी त्यांचा ठराव केला असं भाजप नेते माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी म्हटलंय. सोबतच मी पुढचा एक ठराव  करतो तो म्हणजे राज्यात भाजपचे सरकार येताच अहमदनगर जिल्ह्याला तीन मंत्रीपदं मिळतील, एक राधाकृष्ण विखे, दुसरं राम शिंदे तर तिसरं म्हणजे मोनिका राजळे. पण तुम्ही सगळे मंत्री झाल्यावर आमच्याकडेही लक्ष ठेवा नाहीतर आम्ही माजी ते माजीच राहू असा टोला कर्डीले यांनी लगावला त्यानंतर सभागृहात एकच हशा पिकला. देशाच्या आणि राज्याच्या इतिहासात अशी परिस्थिती आपण कधी पाहिली नाही की एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटले. पण सत्तेतील 90 टक्के 95 टक्के आमदारांचा जो उद्रेक होता तोच राज्यातील जनतेचा उद्रेक होता असं कर्डीले म्हणाले. तर येत्या 3 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस असतील अशी भविष्यवाणी देखील कर्डीले यांनी केली.

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget