पराभूत झालेल्या लोकांना आरक्षण देता येईल का? याचा विचार करतोय, विखे पाटलांचा थोरातांना टोला, म्हणाले, ते राजकीय धक्क्यातून सावरले नाहीत
काही लोक राजकीय सदम्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर केली.
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : काही लोक राजकीय सदम्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यावर केली. या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का? असा विचार करतोय, असा खोचक टोला देखील विखे पाटलांनी थोरातांना लगावला.
स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते, विखेंचा थोरातांना टोला
काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं आश्चर्य वाटतं. स्वतःला भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवत होते असा टोला देखील विखे पाटलांनी थोरातांना लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आरक्षण कोर्टात तुम्ही घालवलं. हे तुमचं पाप असल्याची टीका देखील विखे पाटलांनी केली. आरक्षणाबद्दल तुम्हाला काहीही सोईर सुतक नव्हतं. मराठा आरक्षण मिळू शकत नाही असे तुमचे जाणते राजे सांगायचे असे विखे पाटील म्हणाले. काही लोक राजकीय धक्क्यातून सावरलेले नाहीत.
त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे विखे पाटील म्हणाले. या पराभूत झालेल्या लोकांना काही आरक्षण देता येईल का? असा विचार करतोय असा टोलाही त्यांनी थोरातांना लगावला.
हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी यात्रेवर देखील विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हा सरकारचा शब्द आहे. हाकेंनी विनाकारण मराठा समाजावर टीका करण्याची आवश्यकता नाही असे विखे पाटील म्हणाले. हाकेंनी मुक्ताफळे उधळायची बंद करावीत. समाजाचे पुढारपण करायला बंदी नाही, मात्र दुसऱ्या समाजावर टीका करण्याचा अधिकार नाही असेही विख पाटील म्हणाले.
ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही
बीडमध्ये ओबीसी कार्यकर्त्यांनी वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी केली. यावर बोलतचाना विखे पाटील म्हणाले की, राजकारणात असे जे नवीन पुढारी आहेत त्यांचे समाजासाठी काहीही योगदान नाही. प्रसिद्धीच्या झोतात येऊन स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. ओबीसींना आरक्षण देताना मराठा समाजाने विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही. मराठा समाज जेव्हा स्वतःच्या हक्कासाठी भांडतोय, त्यात आक्षेप असण्याचे कारण काय? असा सवाल देखील विखे पाटलांनी केला. अपघाताने पुढारी झालेले लोक अशा पद्धतीने राजकारण करताय. त्यांच्याबाबत काय बोलावे हा प्रश्न असल्याचे विखे पाटील म्हणाले. काही लोक थिल्लरपणा करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करताय. राजकीय व्यवस्थेला हे मान्य, याचे दुःख असल्याचे विखे पाटील म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा आंदोलनाची आवश्यकता नाही असे विखे पाटील म्हणाले. गाव पातळीवर समिती नेमली आहे. जशी माहिती पुढे येईल त्यानुसार दाखले देण्याची कारवाई सुरू होईल असे विखे पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
























