दुर्देवी...! रस्त्यानं जाताना झाड अंगावर पडलं अन् होत्याचं नव्हतं झालं, पुरंदरमध्ये नवविवाहित दाम्पत्यासह भाचीचा मृत्यू
Purandar Saswad News Latest Update : एक दुर्देवी घटना काल पुरंदरमध्ये घडली. रस्त्यावरील झाड अंगावर पडून नवविवाहित दाम्पत्यासह त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाला आहे.
Purandar Saswad News Latest Update : माणसासोबत कधी काय होईल आणि कधी मृत्यू येईल हे सांगता येत नाही. अशीच एक दुर्देवी घटना काल पुरंदरमध्ये घडली. रस्त्यावरील झाड अंगावर पडून नवविवाहित दाम्पत्यासह त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाला आहे. पुरंदर तालुक्यातील सासवड वीर रस्त्याच्या कडेला असलेले झाड अंगावर पडल्याने परिंचे येथील नवविवाहित जोडप्यासह त्यांच्या भाचीचाही मृत्यू झाला. रेणुकेश जाधव आणि सारिका जाधव असं नवविवाहित जोडप्याचं तर ईश्वरी देशमुख असं त्या दुर्दैवी मृत्यू झालेल्या भाचीचं नाव आहे.
माहितीनुसार तालुक्यातील सासवड वीर रस्त्यावर काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. यावेळी रेणुकेश जाधव आणि त्यांची पत्नी सारिका जाधव हे दोघे त्यांची भाची ईश्वरी देशमुखला घेऊन सासवडहून परिंचेकडे मोटार सायकलवर निघाले होते. संध्याकाळी सात वाजलेच्या सुमारास पिंपळे येथून जात असतांना रस्त्या शेजारील अर्धवट जळलेले वडाचे झाड त्यांच्या अंगावर कोसळले. यामध्ये रेनुकेश व सारिका यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत त्यांची भाची गंभीर जखमी झाली. घटनेनंतर परिसरातील नागरिक मदतीला धावले. यानंतर पोलिसानी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना सासवड येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. मात्र आधीच रेणुकेश आणि सारीका या दोघांचा मृत्यू झाला होता. तर ईश्वरी देशमुख बेशुध्द अवस्थेत असल्याने तिला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान ईश्वरीचा देखील मृत्यू झाला.
रेणुकेश आणि सारिका यांचा चार महिन्यापूर्वीच विवाह झाला आहे. या दुर्देवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
शरद पवारांच्या दरबारात पोहोचले IPS कृष्ण प्रकाश, बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी 'आयर्नमॅन'चा खटाटोप!