एक्स्प्लोर
पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विंग पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू
45 वर्षीय विजय महाडिक हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे कर्मचारी होते. काल मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास ते स्टेज रिकामा करण्याचं काम करत असताना अपघात घडला.
पुणे : पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विंग पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रंगमंच सहाय्यक विजय महाडिक यांना अपघातात प्राण गमवावे लागले.
धनकवडीत राहणारे 45 वर्षीय विजय महाडिक हे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचे कर्मचारी होते. काल मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास ते स्टेज रिकामा करण्याचं काम करत असताना अपघात घडला.
स्टेज रिकामा करण्यासाठी महाडिकांनी विंग हलवली, त्यावेळी नेमका लोखंडी रॉड त्यांच्या डोक्यावर पडला. यामध्ये गंभीर जखम झाल्यामुळे महाडिकांचा मृत्यू झाला.
नाट्यगृहात आज सकाळी होणाऱ्या 'हॅम्लेट' नाटकाच्या प्रयोगासाठी महाडिक तयारी करत होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण हे महापालिकेचं नाट्यगृह आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement