एक्स्प्लोर

Phone Tapping Case  : फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना क्लिन चिट? पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर

Phone Tapping Case : फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Ips Officer Rashmi Shukla) यांना क्लिन चिट देण्याच्या हालचाली सुरू आहेत.  पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय.

मुंबई : राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी (Phone Tapping Case) पुण्याच्या माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Ips Officer Rashmi Shukla) यांना क्लिन चिट देण्याच्या हालचाली सुरू आहेत.  पोलिसांकडून या प्रकरणी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात कार्यरत असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , त्यावेळी भाजपमधे असलेले एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीर रित्या खोट्या नावाने टॅप केल्याचं उघड झालं  होतं. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. परंतु, या प्रकरणी आता पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर केलाय. त्यामुळे या प्रकरणी त्यांची चौकशी बंद होण्याची शक्यता आहे. 

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात पुणे पोलिसांकडून घूमजाव होत असल्याचे चित्र आहे.  कारण रश्मी शुक्ला यांना क्लिन चिट देण्याच्या हालचाली सुरु झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे पोलिसांकडून न्यायालयात या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. माजी पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पुण्यात कार्यरत असताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले , त्यावेळी भाजपमधे असलेले एकनाथ खडसे, अपक्ष आमदार बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांचे फोन बेकायदेशीर रित्या खोट्या नावाने टॅप केल्याचं उघड झालं  होतं.  त्यानंतर पुणे पोलिसांकडून रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर पुणे पोलिसांकडून घुमजाव करण्यात आलं असून रश्मी शुक्लांना क्लिन चिट देण्यासाठी हालचाली सुरू आहेत.  या प्रकरणात पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय.

राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणी विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उच्चस्तरीय समितीने अहवाल सादर केला होता. त्यानंतर शुक्ला यांच्या विरोधात राज्य शासनाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात शुक्ला यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वीच  रश्मी शुक्ला यांची राज्यात पुन्हा नियुक्ती होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या.  कारण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या रश्मी शुक्ला यांनी  18 ऑगस्ट रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 'सागर' या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती.  त्यांच्यापाठोपाठ भाजपचे नेते मोहित कंबोजही (Mohit Kamboj) तिथे आले, त्यामुळे आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली होती. शिवाय 23 सप्टेंबर रोजी रश्मी शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली होती. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Old Couple Home : 80 वर्षांच्या आजी-आजोबांच्या घरावर महापालिकेचा हातोडाRajkiya Shole : उद्धव ठाकरे-चंद्रकांत पाटलांची भेट, लग्नातील भेट युतीच्या गाठीपर्यंत घेऊन जाणार?Zero Hour Raj Thackeray: मनसे पदाधिकारी मेळव्यात टीकेची राज ठाकरेंकडून चिरफाड, राज ठाकरेंकडून चिरफाडZero Hour on Raj Thackeray :विधानसभेच्या निकालावर शंका, राज ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
स्मशानभूमीवर अनेकांनी संसार थाटले, अतिक्रमण त्वरित हटवा; DCDC बैठकीत भाजप खासदार आक्रमक
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
ठाकरे गटाला खिंडार, शिंदेंचं ऑपरेशन टायगर; रविंद्र धंगेकरांसह पुण्यातील 3 माजी आमदार अन् 6 नेते संपर्कात?
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
कोथरुड परीसरात तिघांकडून तरुणावर हल्ला, प्रकृती चिंताजनक, हल्ल्याचं कारण अस्पष्ट 
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
भूमिका बदलाच्या टीकेवर भाजपकडून राज ठाकरेंवर पलटवार; आशिष शेलारांचा मैत्रीपूर्ण सल्ला
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
40 लाख रुपयांत MPSC चा पेपर, परीक्षेच्या दोन दिवस आधी हाती; पुण्यात कॉल रेकॉर्डींग व्हायरल, बोर्डाचं स्पष्टीकरण
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे 4066 नवे आधार किट जिल्हाधिकाऱ्यांना देणार; तुमच्या जिल्ह्यात किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जानेवारी 2025 | गुरुवार
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
'सैराट'मधील लंगड्याची फुल्ल हवा, तानाजीचा लूक नवा; गळ्यात सोनं, हाती घड्याळ, सोबतीला मोनालिसा
Embed widget