एक्स्प्लोर
पुण्यात आज पेट्रोल-डिझेल खरेदी बंद!

फाईल फोटो
पुणे : सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी पुण्यातील पेट्रोल पंप चालकांनी आज पेट्रोल-डिझेल खरेदी बंद आंदोलन पुकारलं आहे. ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेल्या या आंदोलनात द पूना पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे सदस्य सहभागी होती. मात्र पुणे पेट्रोल डीलर असोसिएशन आंदोलनात सहभागी होणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास 12 जुलैपासून बेमुदत खरेदी आणि विक्री बंदचा इशाराही या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. परिणामी 12 जुलैला पुण्यात पेट्रोल पंप बंद राहतील. दररोज बदलणाऱ्या भावांमुळे पेट्रोलपंप चालकांचे नुकसान टाळण्यासाठी एआयपीडीए कायदेशीर लढा देत आहे. केंद्रीय मंत्र्यांनीदेखील तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांचे नुकसान टाळण्यासाठी दराचं एक सूत्र ठरवावे, अशा सूचना दिल्या आहेत. पेट्रोल पंप चालकांच्या तक्रारी - पेट्रोलियम पदार्थांच्या दररोज बदलणाऱ्या दरांमुळे पेट्रोल पंप चालकांचं नुकसान होत असल्याचा आरोप - लोणी काळभोर इथल्या केंद्रावरुन पेट्रोलचे टँकर पेट्रोल घेऊन पंपावर येतात. मात्र प्रत्येक टँकरमधून 100 ते 150 लिटर पेट्रोलची चोरी होत असल्याचा दावा. या चोरीमधे पेट्रोल कंपन्यांचे अधिकारी सहभागी. - तपासणीच्या नावाखाली पोलिसांकडून सतावलं जात असल्याचा पेट्रोल पंप चालकांचा आरोप - पेट्रोल घरपोच पोच करण्याच्या सरकारच्या नव्या निर्णयामुळे पेट्रोल पंप चालकांना त्रास. पेट्रोल घरपोच करणं धोकादायक असल्याचा दावा.
आणखी वाचा























