(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune : शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार? आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक
आज शरद पवारांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार येण्याची शक्यता आहे.
Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज एकत्र येण्याची शक्यता आहे. कारण आज शरद पवारांच्या उपस्थितीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) कार्यकारी मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कार्यकार मंडळाचे सदस्य या नात्याने अजित पवार या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आजच्या या बैठकीकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील उपस्थित राहण्याची शक्यता
शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वात दरवर्षी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाची बैठक होत असते. आजही कार्यकारी मंडळाची बैठक होणार आहे. ही बैठक पुण्यातील मांजरी इथं होणार आहे. अजित पवार यांच्यासोबतच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जयंत पाटील आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
ऊस उद्योगाच्या संदर्भात संशोधन करणारी संस्था
वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट पूर्वाश्रमीची डेक्कन शुगर इंस्टीट्यूट ही महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी एकत्र येऊन साखर उद्योगाशी निगडीत स्थापन केलेली संस्था आहे. ऊस उद्योगाच्या संदर्भात शास्त्रीय, तांत्रिक आणि शैक्षणिक संशोधन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. 19 नोव्हेंबर 1975 ला वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची स्थापना करण्यात आली होती. 385 एकरच्या परिसरात या संस्थेचे कामकाज चालते.
महत्त्वाच्या बातम्या: