सर्वसामान्यांना अपमानास्पद वागणूक देणं भोवलं; पुण्यातील तहसीलदाराचं थेट निलंबन, 10 दिवसांत आदेश
Pune News: पुण्यातील खेडच्या तहसिलदारांना सर्वसामान्यांना अपमानकारक वागणूक देण्यासह इतर गंभीर आरोपांखाली निलंबीत करण्यात आलं आहे. शासनाची प्रतीमा मलीन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली.
Pune news: पुण्यातील खेडच्या तहसिलदारांना सर्वसामान्यांना अपमानकारक वागणूक देण्यासह इतर गंभीर आरोपांखाली निलंबीत करण्यात आलं आहे. पुण्यातील खेड येथील तहसीलदार प्रशांत बेडसे ( Suspension of Pune Tahsildar) यांच्यावर विभागीय चौकशीनंतर 10 दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शासनाची प्रतीमा मलीन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली असून विभागीय चौकशीनंतर अवघ्या १० दिवसात निलंबनाचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहेत आरोप?
सोलापूर जिल्ह्यात मोहोळचे तहसीलदार असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणे, तसेच त्याच काळात सर्वसामान्यांसह वकिलांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या कृतीने शासनाची प्रतिमा मलीन झाल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक
पुण्यातील खेड तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या विरोधात आलेल्या तक्रारी गंभीर असल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील नियम ८ नुसार त्यांच्यावर चौकशीचे आदेश देण्यात आले होते. याप्रकरणी चौकशी अधिकाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली होती. यानंतर विभागीय चौकशीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
निलंबन कालावधीत सोडता येणार नाही मुख्यालय
निलंबन कालावधीत तहसीलदार प्रशांत बेडसे यांना पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात म्हटले आहे.
पुण्यातील पूजा खेडकर प्रकरण प्रसारमाध्यमांपासून समाजमाध्यमांपर्यंत गाजत असताना पुन्हा एकदा सनदी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आठ लाख उत्पन्न दाखवत ओबीसी आरक्षण घेतलं अन्..
आलिशान लाईफस्टाईल आणि मग्रुरी वागण्याने ट्रेनी असतानाच असतानाच वादात सापडलेल्या आयएएस पूजा खेडकर (Pooja Khedkar) कुटुंबाची आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत पूजा आयएएस झाल्या. यासाठी आठ लाख रुपये उत्पन्न असल्याचं सर्टिफिकेट त्यांनी सादर केलं आहे. मात्र, त्यांच्या वडिलांनी म्हणजेच निवृत्त अधिकारी दिलीप खेडकर यांनी लोकसभा निवडणूक लढवताना 40 कोटींची संपत्ती दाखवली होती. मात्र, या कुटुंबीयांची मालमत्ता कितीतरी अधिक असण्याची शक्यता आहे.
ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. 32 वर्षीय पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची 2023 च्या बॅचची IAS अधिकारी आहे. भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केला आहे.
हेही वाचा:
Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरण दिल्लीत पोहोचले; थेट पीएमओनं लक्ष घातलं, घेतला मोठा निर्णय