(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pooja Khedkar : पूजा खेडकर प्रकरण दिल्लीत पोहोचले; थेट पीएमओनं लक्ष घातलं, घेतला मोठा निर्णय
Pooja Khedkar : LSBNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या सामान्य प्रशासनाला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे.
Pooja Khedkar : ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरची मनमानी आणि मिजासगिरीच्या आरोपानंतर पुण्याहून वाशिमला बदली करण्यात आली. 32 वर्षीय पूजा खेडकर महाराष्ट्र केडरची 2023 च्या बॅचची IAS अधिकारी आहे. भारतीय प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवण्यासाठी तिने शारीरिक अपंगत्व श्रेणी आणि इतर मागासवर्गीय (OBC) कोट्यातील लाभांचा गैरवापर केला आहे. दरम्यान, काल (10 जुलै) पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा अहवाल मागिला आहे. मसुरीस्थित लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LSBNAA), जे नागरी सेवा उमेदवारांना प्रशिक्षण देते, खेडकर यांच्या विविध आरोपांवरून राज्य सरकारकडून अहवाल मागवला आहे. अकादमीचा अंतिम अहवाल केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठवला जाईल.
LSBNAA चे उपसंचालक शैलेश नवल यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मान्यतेनंतर राज्याच्या सामान्य प्रशासनाला अहवाल पाठवण्यास सांगितले आहे. मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर त्यांच्या परवानगीशिवाय सौनिकच्या केबिनमध्ये प्रवेश केल्याची माहिती आहे. सौनिक यांनी एका हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार "ती वेळ न मागता आत आली, त्यानंतर मी तिला जाण्यास सांगितले आणि सामान्य प्रशासनाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गद्रे यांना भेटायला सांगितले कारण माझे कामाचे वेळापत्रक व्यग्र आहे." दरम्यान, पूजाची बदली झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी पूजा आज वाशिममध्ये कर्तव्यावर रुजू झाली आहे.
पूजाची छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे सडकून टीका
खासगी ऑडीवर व्हीआयपी क्रमांकासह तसेच लाल दिवा असल्याने पूजाची छायाचित्रे व्हायरल झाल्यामुळे सडकून टीका होत आहे. सिस्टीमचा गैरवापर केल्याचा आरोप सोशल मीडियातून होत आहे.
ओबीसी, पीडब्ल्यूबीडी कार्ड खेळले!
कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या सेवा वाटप यादीनुसार, पूजाने OBC आणि PWBD (बेंचमार्क अपंग व्यक्ती) श्रेणी अंतर्गत अखिल भारतीय रँक 821 सह IAS श्रेणी घेतली आहे. विशेष म्हणजे, पूजाने ओबीसी प्रवर्गांतर्गत अर्ज केला होता. ज्यात क्रिमी लेयर प्रमाणपत्रासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ₹8 लाख आहे.
वडिलांनी वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकावले
पूजाचे वडील दिलीप खेडकर महाराष्ट्र सरकारचे निवृत्त वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांनी वार्षिक उत्पन्न ₹43 लाख घोषित केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा (LS) निवडणुकीसाठी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात अंदाजे ₹40 कोटींची संपत्ती असल्याचे जाहीर केलं आहे. दिलीप खेडकर यांनी अहमदनगरमधून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. पूजाच्या एका मॉक इंटरव्ह्यूमध्ये, ज्याचा व्हिडिओ एका खाजगी कोचिंग क्लास अकादमीने सोशल मीडियावर जारी केला होता. त्यामध्ये पूजाला उत्पन्नाबद्दल विचारले असता, तिने दावा केला की तिचे पालक वेगळे झाले आहेत आणि ती त्यांच्या संपर्कात नाही. मात्र, पुण्यात ड्युटी रुजू झाल्यानंतर पूजाच्या वडिलांनी तिला सोबत घेऊन एका वरिष्ठ अधिकाऱ्याला धमकावले होते.
UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, पूजाला नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने पहिल्यांदा 22 एप्रिल 2022 रोजी तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यासाठी आणि तिने सादर केलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. एम्सने तिला सहा वेळा कॉल करूनही ती आली नाही. कोविड-19 किंवा एमआरआय करण्यास असमर्थता यासारखी विविध कारणे गेलीच नाही.
इतर महत्वाच्या बातम्या़