एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा!
मुंबई : इयर एण्डिंगच्या निमित्ताने पुण्यात होणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. तहसीलदाराने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर पुन्हा सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
पुण्यातील सनबर्न फेस्टिव्हलला 'सनातन'चा विरोध
सनबर्न फेस्टिव्हल ज्या जागेवर होणार आहे, त्या जागेचे मालक दत्तात्रय पालसकर यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र सनबर्न फेस्टिव्हलला परवानगी दिल्याची माहिती तहसीलदारांनी हायकोर्टात सादर केली. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकेवर पुढे सुनावणी करण्यास नकार दिला आहे. काय आहे सनबर्न फेस्टिव्हल? 'सनातन'चा आक्षेप काय? दरम्यान, आजपासून तीन दिवसांच्या सनबर्न फेस्टिव्हलला सुरुवात होत आहे. पण हिंदू जनजागृती समिती आणि सनातन संस्थेने सनबर्न फेस्टिव्हलला विरोध केला आहे. सनबर्नमुळे महाराष्ट्राची संस्कृती धोक्यात येईल, असा सनातनचा दावा आहे. दुसऱ्या बाजूला राज्याचे पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सनबर्नला सरकारचा संपूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement