एक्स्प्लोर
'मेपल'च्या कार्यालयासमोर पैसे घेण्यासाठी रांगा

पुणे: पाच लाखात पुणे जिल्ह्यात घर देण्याचा दावा करून 1145 रुपये लोकांकडून उकळणाऱ्या मेपल ग्रुपनं हे पैसे परत देण्याचं आश्वासन दिलं आहे.
पुण्यातल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आणि मेपलच्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मेपल ग्रुपनं सर्व ग्राहकांना पैसे परत करणार असल्याचं सांगितलं आहे. या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर आता मेपल ग्रुपच्या कार्यालयाभोवती पैसे परत घेणाऱ्यांचा गराडा पडला आहे.
मात्र, तब्बल 38 तासांनंतरही मेपल ग्रुपचा संचालक सचिन अग्रवाल अजूनही बेपत्ता आहे.
खरंतर मेपल ग्रुपला नागरिकांचे पैसे परत करण्याचे आदेश दोन दिवसांपूर्वीच देण्यात आले होते. मात्र, दोन दिवसांपासून मेपल ग्रुपने सरकारच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. मात्र, आता अटक टाळण्यासाठी मेपल ग्रुपने नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.
मेपल ग्रुपने आज दुपारपासून ‘आपलं घर’ योजनेत घर बुक केलेल्या नागरिकांचे पैसे परत करण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे ‘आपलं घर‘ योजना?
गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या अवतीभवती 5 लाखांमध्ये ‘आपलं घर’ ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला तुफान प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत 10 हजार लोकांनी नोंदणी केल्याचं कळतं.
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत ही योजना राबवण्यात आल्याची माहिती कंपनीच्या संचालकांनी दिली आहे. त्यासाठी प्रत्येक अर्जदाराकडून 1 हजार 150 रुपये अनामत रक्कम परत न देण्याच्या अटीवर भरुन घेण्यात आली आहे.
जे अर्जदार पंतप्रधान आवास योजनेसाठी पात्र ठरतील त्यांना 5 लाखात आणि जे ठरणार नाहीत, त्यांना साडे सात लाखामध्ये वन बीएचके फ्लॅट मिळेल अशी जाहिरात करण्यात आली आहे. अर्थात, त्याआधी लॉटरीसुद्धा काढली जाणार आहे.
संबंधित बातमी :
मंत्री गिरीष बापट खोटं बोलत आहेत?
बापट आणि पोलिसांदेखत ‘आपलं घर’चा सचिन अग्रवाल पळाला!
स्वस्त घरासाठी ‘मॅपल’च्या केंद्रावर आजही पुणेकरांच्या रांगा
‘आपलं घर’चा केंद्र आणि राज्य सरकारशी संबंध नाही : प्रकाश मेहता
पुण्यातील ‘5 लाखात आपले घर’ योजनेवर सोमय्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
फोटो : काय आहे पुण्यातील ‘5 लाखात आपलं घर’ योजना?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बीड
बातम्या
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
