एक्स्प्लोर

Grass Carpet : देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताचा गालिचा पाहिलाय का? पुण्यात होतेय निर्मिती

देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिच्याची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजिरवाडीजवळील पेठ नायगाव येथे या पर्यावरणप्रेमींनी गालिचा बनवण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे.

Grass Carpet : देशातील सर्वात मोठ्या नैसर्गिक गवताच्या गालिच्याची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजिरवाडी जवळील पेठ नायगाव येथे या पर्यावरणप्रेमींनी गालिचा बनवण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढतं प्रदूषण लक्षात घेऊन या गालिच्याची निर्मिती करण्यात आली आहे. लोकांमध्ये पर्यावरण विषयक जनजागृती करण्यासाठी पुण्यातील पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. 

प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीचे जिबॉय तंबी यांनी पुणे सोलापूर रस्त्यालगत कुंजीरवाडी येथे हा प्रकल्प उभारला आहे. यामध्ये, नैसर्गिक पर्यावरणासाठी उत्तम असलेल्या गवतापासून गालिचा बनविला जातो. या गालिच्यांचा वापर फक्त घरासाठीच नाही तर क्रिडांगणासाठी देखील करण्यात येऊ शकणार आहे. याचा वापर करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी लागणारा खर्च देखील कमी प्रमाणात येणार आहे. दोन दिवसातून एकदा पाणी घातल्याने हा गालिचा ताजा राहतो. त्यामुळे पाणी देखील कमी प्रमाणात लागणार आहे. 

गालिचा निसर्गासाठी आणि मानवासाठी देखील उपयुक्त
संपूर्णपणे नैसर्गिक असलेला हा गालिचा निसर्गासाठी आणि पर्यावरणाचं जतन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. अनेक गालिच्यांमुळे पर्यावरणात वेगवेगळे वायु पसरण्याची भीती असते मात्र या गालिच्यामुळे नैसर्गिक वायु सगळीकडे असणार आहे. तसंच मानवासाठी देखील या गालिच्याचे अनेक फायदे आहे. शुद्ध हवा निर्मिती होण्यास मदत होत असल्याने श्वसनाचे आजाराचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे शिवाय अनवाणी पायाने या गालिच्यावर चालल्यास अनेक आजारांपासून दूर राहण्यास देखील मदत होणार आहे. पुणे, केरळ, कोचीन, आंध्र प्रदेश, हैदराबाद या शहरांत गालिच्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरु आहे. 

प्लॅंटर्स कंपनी मार्फत तयार केला जातोय हा गालिचा
प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीचे जिबॉय तंबी यांची केरळमध्ये प्लॅंटर्स नावाची कंपनी आहे. ती कंपनी पर्यावरणपूरक अनेक गोष्टीसाठी काम करते. ते नवीन प्रकारचे गवत, स्थानिक वनस्पती आणि बी बर्ड बटरफ्लाय गार्डनिंग (BBB) ​​तयार करतात. बफेलो ड्वार्फ ग्रास ही त्यांची प्रमुख निर्मिती आहे. हे लँडस्केपिंग गवत म्हणून लोकप्रिय होत आहे. प्राण्यांसाठी देखील हे गवत उपयुक्त आहे. स्थानिक वनस्पती, स्थानिक हवामान आणि मातीच्या परिस्थितीशी हे गवत जुळवून घेतात. त्यामुळे स्थानिक परिसरात या वनस्पती नैसर्गिकरित्या उगवतात. हवामानचा अंदाज आणि स्थानिक हवामानाला साजेसं असं गवत तयार करण्यात त्यांनी पुढाकार घेतला असल्याचं प्लांटर्स इंडिया लँडस्केपिंग कंपनीचे जिबॉय तंबी यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget