(Source: Poll of Polls)
Pune Dog : पुणेकर माणुसकी विसरले? कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबलं; दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
भटक्या कुत्र्यांचे चार पाय आणि तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मोबाईल कॅमेऱ्यात ही क्रूरता कैद झालीये. ही अमानुष घटना पिंपरी चिंचवड लगतच्या देहूरोड परिसरात घडली आहे.
पुणे : भटक्या कुत्र्यांचे चार पाय आणि तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबल्याचा(Pune Crime News) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोबाईल कॅमेऱ्यात ही क्रूरता कैद झाली आहे. ही अमानुष घटना पिंपरी चिंचवड लगतच्या देहूरोड परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा ही दाखल झाला आहे. पण त्या तीन भटक्या कुत्र्यांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
3 सप्टेंबरच्या सायंकाळी देहूरोडच्या संकल्प नगरी सोसायटीत हा प्रकार घडल्याचा आरोप प्राणी मित्रांनी केला आहे. या सोसायटीत भटक्या कुत्र्यांचा नेहमीच वावर असतो, यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले होते. या कुत्र्यांपासून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी हा क्रूर प्रकार केल्याचं बोललं जातं आहे. 3 सप्टेंबरच्या सायंकाळी तीन कुत्र्यांचे पाय आणि तोंड बांधून, त्यांना पोत्यात डांबण्यात आलं. अमानुषपणे सुरु असलेलं हे कृत्य काहींनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलं आणि प्राणी मित्रांना याची कल्पना दिली. त्यांनी तातडीने संकल्प नगरीत धाव घेतली, पण तोपर्यंत कुत्र्यांना इतरत्र हलवण्यात आलं होतं. मग प्राणी मित्रांनी देहूरोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली अन् दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप त्या कुत्र्यांचा शोध लागलेला नाही.
सोसायटीत कुत्रा घुसल्याने विष पाजून घेतला जीव...
काहीच दिवसांपूर्वी एका कुत्र्याला मारहाण करुन विष देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी तक्रार दाखल करून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अमीर खान (23) यांनी कोंढव्यातील अतूर व्हिला विस्टा सोसायटीच्या सुरक्षारक्षक आणि इतर तीन लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांनी कुत्र्याचा वेदनांनी रडण्याचा आवाज ऐकला. तो त्वरीत बाल्कनीकडे धावला जिथे त्याला काही लोक लाठी मारताना दिसले होते, असा दावा खान यांनी त्यांच्या तक्रारीत केला होता. कुत्र्याला सोसायटीच्या मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ते हा प्रकार करत आहेत, असं त्याला सांगण्यात आलं होतं. कुत्र्याला मारहाण करु नका असं खान आणि त्याच्या आईने आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र चौघेही यांचं ऐकायला तयार नव्हते. त्यानंतर खान आणि त्याच्या आईने या घृणास्पद कृत्याची नोंद केली आणि अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाशी संपर्क साधला. थोड्याच वेळात, एक प्राणी मित्र दाखल झाला आणि परिस्थिती पाहिली. त्यावेळी कुत्राचा मृत्यू झाला होता.
इतर महत्वाची बातमी-
Dog License : परवाना काढा, अन्यथा तुमचा महागडा श्वान जप्त होणार; दंडात्मक कारवाई देखील