Pune Crime News : बॉयफ्रेण्डकडून गर्लफ्रेण्डला त्रास देणाऱ्या तरुणाचं गुप्तांग कापण्याचा प्रयत्न
गर्लफ्रेण्डला त्रास देणाऱ्या तरुणाचं गुप्तांग बॉयफ्रेण्डने कापण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे.
Pune Crime New : गर्लफ्रेण्डला त्रास देणाऱ्या तरुणाचं गुप्तांग बॉयफ्रेण्डने कापण्याचा (Pune crime) प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली आहे आणि दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्ज देण्याच्या बहाण्याने तरुण महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडला. त्रास देणारा तरुण एका फायनान्स कंपनीमध्ये काम करतो आणि महिला पुण्यात बचत गट चालवते. काही कारणासाठी महिलेला पैशांची गरज भासल्यामुळे तिने त्रास देणाऱ्या तरुणाच्या फायनान्स कंपनीतून कर्ज घेतलं होतं. त्यानंतर पुन्हा कर्ज हवं असल्याने त्या दोघांमध्ये व्हॉट्सअॅपद्वारे चॅटिंग सुरु झाली. अनेक दिवस दोघांमध्ये चॅटिंग सुरु होती. या संदर्भात महिलेल्या बॉयफ्रेण्डला माहिती मिळाली त्यांनतर त्याने त्रास देणाऱ्या तरुणाला गर्लफ्रेण्डच्या फोन करुन कात्रज बोगद्याजवळ बोलवलं. त्यानंतर त्याला बॉयफ्रेण्ड आणि त्याच्या साथीदाराने गाडीवर बसवून शिंदेवाडी परिसरातील निर्जन स्थळी नेलं. एकाने त्याला खाली पाडलं आणि दुसऱ्याने त्यांच्या गुप्तांगावरील कातडी धारदार शस्त्राने सोलून काढली. त्याच्या डोक्याला देखील मारहाण केली. मारहाण केल्यानंतर त्याला कात्रज परिसरातील एका हॉटेलजवळ आणून सोडून दिलं.
गंभीर जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु होता. त्यावेळी त्याने आई आणि भावाला घटनास्थळी बोलवून घेतलं. त्यांच्या कुटुंबियांनी त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहे. रुग्णालयाने पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिल्यानंतर घटना उघडकीस आली. महिला आणि तिच्या साथीदारांनी त्याला धमकी दिल्याने पोलिसांत तक्रार देण्यास घाबरत होता. मात्र रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात जबाब नोंदवला. घटनेची गंभीरता लक्षात घेत पोलिसांंनी महिलेला अटक केली आहे आणि हल्ला करणाऱ्या अन्य दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिलेचा पती सराईत गुंड होता
आरोपी महिलेचा पती पुण्यातील सराईत गुंड होता. वर्षभरापूर्वी त्याचा पूर्ववैमनस्यातून खून करण्यात आला होता. तिला पैशाची गरज भासली तिने फायनान्स कंपनीकडून पैसे घेतले. त्यानंतर दोघांमध्ये चॅटिंग सुरु झाली. पुन्हा पैसे लागत असल्याने चॅटिंगचं प्रमाण वाढत गेलं. त्या तरुणाने महिलेच्या जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याने जवळीक साधण्याचा केलेला प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडला.