Pune Crime : आता काय म्हणावं! वाहतूक पोलिसानेच केला दारु पिऊन, हाती तलवार घेऊन धिंगाणा
मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने भर रस्त्यात तलवार उगारून दहशत (Terror) माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली आहे.
Pune Crime : पुण्यात मागील काही दिवसांपासून कोयता (Pune Police) गॅंगची दहशत कायम आहे. मात्र यातच आता वाहतूक पोलिसांनी केलेल्या कृत्यामुळे (Pune Crime News ) पोलीस विभागावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहतूक पोलिसाने भर रस्त्यात तलवार उगारgन दहशत (Terror) माजवल्याची घटना घडली आहे. ही घटना विश्रांतवाडी भागात घडली आहे. पोलिसानेच असं कृत्य केल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव असं या पोलिसाचं नाव आहे.
या तलवार उगारणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिले आहेत. त्यानुसार विजय उर्फ करण लक्ष्मण जाधव यांना निलंबित करण्यात आलं आहे. जाधव हे पुण्यातील मुंढव वाहतूक शाखेत कार्यरत आहेत. पुण्यातील धानोरी परिसरात त्यांनी जाणता राजा चौकात तलवार घेऊन दहशत पसरवली. यासंदर्भातील माहिती विश्रांतवाडी पोलिसांनी मिळाली. त्यानंतर लगेच पोलिसांनी धानोरीतील जाणता राजा चौकात धाव घेतली आणि जाधव यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता हे मुंढवा येथील वाहतूक शाखेत कार्यरत असल्याचं समोर आलं त्यानंतर त्यांनी दारु पिऊन धिंगाणा केल्याचंही समोर आलं. त्यानंतर त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घातल्याप्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला. जाधव याची चौकशी करण्यात आली.
पोलीस विभागाची प्रतिमा मलिन केली
पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारी आणि दहशत माजवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सगळ्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. कोयता गॅंगच्या दहशतीने धुमाकूळ घातला होता. त्यानंतर गाड्या फोडणारी टोळीदेखील समोर आली होती. या टोळीने पुण्यातीन अनेक परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांचं नुकसान केलं होतं. त्यानंतर पुणे पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरु केलं होतं आणि यांसारख्या कोयता किंवा बाकी टोळींना आळा घालण्याचं काम पुणे पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्याच विभागातील एका वाहतूक पोलिसांनी स्वत: तलवार दाखवून दहशत निर्माण केल्याचं कृत्य केलं. यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा मलिन झाल्याने तातडीने या वाहतूक पोलिसाला निलंबित करण्याचे आदेश पोलीस विभागाकडून देण्यात आले आहेत.