Pune News : आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरु होता वेश्याव्यवसाय; मालकाविरोधात गुन्हा दाखल
Pune News: पुणे-सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे.
Pune News Pune : मागील काही दिवसांपासून (Pune Crime News) पुण्यात अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणात छापे टाकले जात आहेत. त्यात अशा धंद्यांवर पोलिसांची करडी नजरही आहे. अशातच आता पुणे-सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. कारवाई करत पोलिसांनी दोन महिलांना ताब्यात घेतले आहे. आयुर्वेद उपचार केंद्राच्या दोन्ही मालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिंहगड रोडवरील माणिकबाग परिसरातील एका इमारतीत आयुर्वेद उपचार केंद्राच्या नावाने वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने बनावट ग्राहकाच्या माध्यमातून सबळ पुरावे गोळा करून तेथे छापा टाकला. पोलिसांनी तेथून दोन महिलांना ताब्यात घेतले. आयुर्वेद उपचार केंद्राचे मालक आणि व्यवस्थापक यांनाही ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत तेथून एक लाख 52 हजार रुपयांचे मोबाईल संच आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली. अशा प्रकारचे अवैध धंदे अजून कोणत्या ठिकाणी सुरु आहे, याचा पोलीस शोध घेत आहे.
काही दिवसांपूर्वी हडपसरमधील अशाच प्रकारच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. देहविक्रीसाठी आणलेल्या पीडित महिलांची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कॉन्स्टेबल रंजना पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मारुती महादेव जाधव, कृष्णा दिनकर जाधव रमेश ढोरे, परमेश्वर काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हरपळे वस्तीतील ढोरे पेट्रोल पंपासमोरील स्वर्ग लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. या ठिकाणाहून नवी मुंबईतील 37 वर्षीय महिला आणि पश्चिम बंगालमधील 27 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली होती. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी रोडवरील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली होती.
अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर
पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. याच सगळ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यासोबतच बाकी गुन्ह्याच्या संख्येत देखील वाढ झाल्याचं मागील काही दिवसात घडत असलेल्या घडनांमुळे समोर आलं आहे.