(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : पुणेकराचा प्रताप! पत्नीने घटस्फोटासाठी तक्रार दिली अन् पठ्ठ्याने रागाच्या भरात थेट पार्किंगमधल्या गाड्याच पेटवल्या...
पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून पतीने थेट गाड्याच पेटवल्या आहे. यामुळे गाड्यांचं नुकसानदेखील झाली आहे.पुण्यातील कोंढवा भागातून हा अजब प्रकार समोर आला आहे.
Pune Crime News : रागाच्या भरात आतापर्यंत अनेकांनी अनेक कारनामे केल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेत. कोणी रागात एखद्याचा जीव घेतला आहे तर कोणी मारहाण केली आहे. मात्र पुण्यातील एका व्यक्तीने रागाच्या भरात केलेल्या कृत्याची चर्चा सध्या शहरभर होत आहे. या पठ्ठ्याने पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली म्हणून थेट गाड्याच पेटवल्या आहेत. यामुळे गाड्यांचं नुकसान झालं आहे.
पुण्यातील कोंढवा भागातून हा अजब प्रकार समोर आला आहे. 4 दुचाकी, 1 चार चाकी आणि एका रिक्षाला आग लावली आहे. यात काही गाड्या जळून खाक झाल्या आहेत तर इतर गाड्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. टेरेन्स डॉमिनिक जॉन असे या व्यक्तीचे नाव आहे. गाड्या पेटवल्यामुळे अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
हा सगळा प्रकार सोमवारी (13 मार्च) पहाटे 5 वाजता घडला. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर आरोपी कोणतेही काम धंदा करत नव्हता म्हणून पत्नीने त्याच्याविरोधात घटस्फोटासाठी अर्ज दिला. पत्नी सोबत राहायचे असल्यामुळे त्याने अनेक वेळा तिला घटस्फोट देऊ नको असे सांगितले तरी सुद्धा त्याच्या पत्नीने अर्ज दाखल केला. घटस्फोटाच्या अर्जावरुन चिडलेल्या जॉनने पत्नीची दुचाकी जाळायचे ठरवले आणि तसे केले सुद्धा. यावेळी पार्किंगमध्ये असलेल्या इतर दुचाकींसह परिसरातील चारचाकी, रिक्षा आणि इतर दुचाकी यांच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्या. पोलिसांनी टेरेन्सला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
राग आल्याने दुसऱ्यांच्याही गाड्या पेटवल्या...
पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दिली त्यामुळे टेरेन्सचा राग अनावर झाला. त्याने आपल्याच पत्नीची गाडी पेटवण्याचं ठरवलं आणि गाडी पेटवली. त्यानंतर पुन्हा राग आल्याने त्याने पार्किंगमधील इतरांच्या गाड्याही पेटवल्या. यामुळे सोसायटीतील अनेकांच्या गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शिवाय त्यात एक रिक्षाही असल्याने तिचंही नुकसान झालं आहे. त्यामुळे इतर नागरिकांनी त्यांच्यावर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
अन् रागाच्या भरात आजोबांनी 10 लाखांच्या साऊंड सिस्टीमचा चुराडा केला
काही दिवसांपूर्वी पुण्यात रागाच्या भरात एका आजोबांनी 10 लाखांच्या साऊंड सिस्टीमचा चुराडा केल्याची घटना समोर आली होती. वाढत्या वयामुळे ज्येष्ठ नागरिकांना (senior citizen) इतर व्याधींसह मोठ्या आवाजाचाही त्रास होतो. सध्या कोणताही कार्यक्रम असला की हौशी लोक मोठ्या मोठ्या साऊंड सिस्टिम (sound system) लावून आनंद साजरा केला जातो. हा आवाज सहन न झाल्याने त्यांनी थेट सिस्टीम फोडली होती.