एक्स्प्लोर

Pune Bypoll election : ''बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत'; मनसेने भाजपला पाठिंबा देताच राष्ट्रवादीचे टीकास्त्र

Pune : कसबा आणि चिंचवड मतदार संघासाठी मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीने टीका करायला सुरुवात केली आहे.

Pune Bypoll election : पुण्यात कसबा आणि चिंचवड मतदार (Pune Bypoll Election) संघात पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाविकास आघाडी आणि भाजपकडून  प्रचाराची जोरदार तयारी सुरु झाली आहे. दोन्ही मतदार संघासाठी मनसेने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पुण्यातील राष्ट्रवादीने टीका करायला सुरुवात केली आहे. ज्या भाजपच्या विरोधात आतापर्यंत पुण्यात मनसे लढत होती. तोच पक्ष आता भाजपला पाठिंबा देणार आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली आहे.

प्रशांत जगताप म्हणाले की, कोथरुडच्या निवडणुकीच्या वेळी मनसेने भाजपविरोधात भूमिका घेतली होती. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि कांग्रेसची मतं मिळवली होती. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला पाठिंबा देताय...बोलघेवडे पोपट ED च्या तालावर नाचू लागलेत, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर आणि मनसेवर टीका केली आहे. 

यावेळी त्यांनी कोथरुडच्या निवडणुकीची आठवण करुन दिली आहे. या निवडणुकीत मनसेने भाजपच्या विरोधात अर्ज दाखल केला होता. 2019 मध्ये कोथरुड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. कोथरुड मतदारसंघात भाजपनं चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मनसे उमेदवार अॅड. किशोर शिंदे यांना उमेदवारी दिली होती. मात्र यावेळी मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपच्या दबावाखाली येऊन त्यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपला सगळ्यांना आपलं करुन घ्यायचं आहे. त्यांना पोटनिवडणुकीत काही प्रमाणात भीती वाटत असेल त्यामुळे त्यांनी मनसेला पाठिंबा मागितला असावा, असं ते म्हणाले.

मनसेचा भाजपला पाठिंबा

कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपने फार प्रयत्न केले होते. मात्र, त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. त्यानंतर ही निवडणूक बिनविरोध करावी यासाठी मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील पत्राद्वारे आवाहन केलं होतं. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यानंतर मनसे नेमकं कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मंगळवारी, मनसेने आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपला पाठिंबा देणार असल्याचं मनसे नेते बाबू वागस्कर यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मनसेवर टीका करायला सुरुवात केली. कसब्यात भाजपचे हेमंत रासने आणि कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांच्यात तगडी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5PM 14 January 2025Top 25 | टॉप 25 बातम्यांच्या सुपरफास्ट आढावा सुपरफास्टWalmik Karad Mother : रॉकेलचा डबा आणा, अंगावर टाकून फुकून द्या! कराडच्या आईची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 14 January 2025 दुपारी 4 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
... म्हणून बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटविण्याची मागणी; मंत्री सामंताचं स्पष्टीकरण
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
Video: शिवसेनेची काँग्रेस होतेय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधवांना ऑफर; ते अनुभवी,मोठे नेते
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
केक कापला, फुले उधळली; पुण्याच्या बॉम्बस्कॉड पथकातील 'तेजा'ला निरोप, अधिकारी भावूक
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
मोठी बातमी! ST कर्मचाऱ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात 25 खाटांचे रुग्णालय; परिवहन मंत्र्यांची घोषणा
Walmik Karad MCOCA : लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
लेकावर मकोका, वाल्मिक कराडच्या आईंची प्रकृती बिघडली; समर्थकांचा संताप, बीडमध्ये घडामोडींना वेग
Walmik Karad Mcoca: हिवाळी अधिवेशनात वात पेटवली अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
हिवाळी अधिवेशनात 'आका' 'आका' बोलत रान पेटवलं, अन् महिनाभरात सुरेश धसांना हवं ते झालंच, वाल्मिक कराडांना मकोका लागला!
Walmik Karad MCOCA : वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
वाल्मिक कराडवर मकोका, संतोष देशमुखांच्या भावाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
मकोका लावल्याने वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या; CID पुन्हा ताब्यात घेणार, जामीन मिळणार का?
Embed widget