एक्स्प्लोर

Pune ACB Trap : मनसे कार्यकर्त्यांकडून लाचखोर डीनच्या कार्यालयाची तोडफोड

टल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची तोडफोड केली आहे.

Pune ACB Trap :  अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर (ACB Trap) डीन विरोधात मनसे विद्यार्थी सेना आक्रमक झाली आहे. त्यांनी अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात शिरुन कार्यालयाची तोडफोड केली आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी डीन विरोधात आंदोलन छेडलं होतं. याच आंदोलनादरम्यान कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी डीनच्या खुर्चीला नोटांचा हारही घातला.

पुणे महानगरपालिकेच्या नव्याने स्थापन झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामधील दहा लाख रुपये स्वीकारताना डीनला रंगेहात पकडण्यात आले होते. आशिष श्रीनाथ बनगिनवार, (वय 54 वर्ष, डीन (वर्ग-1) असे रंगेहात पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे, शिक्षणाच्या महेर घरात पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीनला तबल 10 लाख रुपयांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यांनी 16 लाखांची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता घेताना पकडण्यात आले. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

शिक्षणाच्या माहेरघरात अशा प्रकारचं कृत्य घडल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या विरोधात मनसेच्या विद्यार्थी सेनेने आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयातील लाचखोर डीन आशिष श्रीनाथ बनगिनवार यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी कार्यालयात मोठा गोंधळही झाला होता. कार्यकर्त्यांनी सगळ्या कार्यालयाची तोडफोड केली. खुर्च्या उलट्या करुन तोडण्याचा प्रयत्न केला. कार्यलयाच्या बाहेरीला बाजूस असलेल्या खुर्च्याही त्यांनी तोडल्या आहेत. 

काय आहे प्रकरण?

महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी सोळा लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या डीनचं नाव आशिष श्रीनाथ बनगिनवार (वय 54) असे आहे. लाचेची मागणी केल्याबाबत पुण्यातील 49 वर्षीय डॉक्टर यांनी तक्रार दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आशिष श्रीनाथ बनगिनवार हे महापालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजचे डीन आहेत तर हे पुण्यातील एक मोठे डॉक्टर आहेत. दरम्यान तक्रारदाराचा मुलगा नीट परीक्षा 2023 मध्ये उत्तीर्ण झाला होता. त्याची एमबीबीएसच्या प्रवेशासाठी महाराष्ट्र राज्याच्या पहिला कॅप राऊंडमध्ये पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट अंतर्गत भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय येथे इन्स्टिट्यूशनल कोट्यामधून निवड झाली होती. अशिष यांनी प्रवेश फी व्यतिरिक्त 16 लाख रुपयांची मागणी केली होती. यातील 10 लाख रुपये घेताना अशिष यांना रंगेहाथ पडकलं होतं. 

इतर महत्वाच्या बातम्या-

Pune News : कॉंग्रेस नेते अन् नागरिक एकमेकांवर भिडले; पुणे महापालिकेसमोर नक्की काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget