एक्स्प्लोर
मुलीशी प्रेमसंबंध असल्याने पीएसआयकडून तरुणाची जाळून हत्या
![मुलीशी प्रेमसंबंध असल्याने पीएसआयकडून तरुणाची जाळून हत्या Psi Killed Youth After Revealing Affair With Daughter मुलीशी प्रेमसंबंध असल्याने पीएसआयकडून तरुणाची जाळून हत्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/12141045/Washim-Map-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
वाशिम : वाशिममध्ये दोन महिन्यांपूर्वी आढळलेल्या मृतदेहामागे पोलिस अधिकाऱ्याचा हात असल्याचं समोर आलं आहे. मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधांच्या रागातून पीएसआयने तरुणाची हत्या केली होती.
वाशिममधल्या मानोरा भागात दोन महिन्यांपूर्वी अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या हत्येमागे एका पीएसआय तुकाराम ढोकेंचा हात असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
22 ते 25 वर्ष वयोगटातील मृत तरुण अमरावतीचा रहिवासी होता. मंगरुळपीरमधील पोलीस उपनिरीक्षक असलेल्या ढोकेंच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. त्यातूनच प्रेमापोटी दोघांनी घरातून पळ काढला होता.
त्या रागातून ढोकेंनी ही हत्या केल्याची माहिती आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाला अटकही केली गेली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)