एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजा करु न देण्यावर मराठा मोर्चेकरी ठाम
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आयोजित केलेल्या चर्चेवर ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या आंदोलकांनी बहिष्कार टाकला आहे.
पंढरपूर : आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेस मराठा समाजाने विरोध केला. यावर मार्ग काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख यांनी आयोजित केलेल्या चर्चेवर ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या आंदोलकांनी बहिष्कार टाकला आहे.
आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय पूजेला विरोध करणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांशी विजय देशमुख चर्चा करणार होते. पण आंदोलकांनी चर्चेवर बहिष्कार टाकल्याने पालकमंत्र्यांसह सर्व अधिकाऱ्यांना दिवसभर विश्रामगृहावर केवळ वाट पाहत बसावं लागलं.
आपण कोणत्याही परिस्थितीत आता चर्चा करणार नसल्याचे मराठा समाजाचे शंकर सुरवसे आणि धनगर समाजाच्या माऊली हळणवर यांनी सांगितलं.
‘आंदोलकांनी पालखी सोहळा खंडित करू नये,’ असं आवाहन पालकमंत्री देशमुखांनी केलं आहे.
‘प्रशासन महापूजेसाठी सज्ज आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा होईल, अशी ठाम भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. ‘सरकार आणि प्रशासन आंदोलकांशी चर्चेच्या तयारीत असून यातून तोडगा निघेल. मात्र दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई केली जाईल,’ असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
पालकमंत्र्यांसोबत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू आणि अनेक वरिष्ठ अधिकारी दिवसभर फक्त आंदोलकांची वाट पाहत बसलेले दिसले . आंदोलकांशी चर्चेत मदत होईल म्हणून काँग्रेसचे स्थानिक आमदार भारत भालके यांनादेखील निमंत्रित करण्यात आलं होतं.
दरम्यान, यापूर्वी माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना देखील एकदा तणावाच्या परिस्थितीमुळे आषाढीच्या पूजेला मुकावं लागलं होतं. तशीच परिस्थिती सध्या तयार होऊ लागल्याने मुख्यमंत्र्यांच्या पूजेवर अनिश्चिततेचे सावट आहे .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement