एक्स्प्लोर
देहविक्री करणाऱ्या महिलांच रक्षाबंधन, विम्याची भेट
नगरच्या स्नेहालयात जाऊन या भावांनी राखी बांधून घेत आपल्या या बहिणींना एक अनोखी भेट देत समजा समोर एक आदर्श ठेवला.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात आर्ट ऑफ लिव्हिंगने अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलं. समाजातून उपेक्षित असलेल्या देहविक्री करणाऱ्या महिलांकडून युवकांनी राखी बांधून घेतली आहे. रक्षाबंधन भेट म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे या महिलांचा मोफत विमा उतरवण्यात आला. देहविक्री करणाऱ्या स्त्रियांना समाज नेहमीच वाईट नजरेने पाहत आला आहे. मात्र आज याच बहिणींना रक्षाबंधनाच्या निमित्ताने भावाची कमी वाटू नये आणि तुमच्या पाठीशीही कोणी तरी आहे, हा विश्वास देण्यासाठीचा प्रयत्न अहमदनगरच्या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि युवाचेतनाच्या युवकांनी केला. नगरच्या स्नेहालयात जाऊन या भावांनी राखी बांधून घेत आपल्या या बहिणींना एक अनोखी भेट देत समजा समोर एक आदर्श ठेवला. रक्षाबंधनाच्या निमित्ताने येथील सर्व भगिनींना पंतप्रधान विमा योजनेची भेट देण्यात आली. समाज जरी या महिलांपासून मानसिक रित्या दूर असला तरी आम्ही नेहमीच तुमच्यासारख्या बहिणींच्या पाठीमागे खंबीर पणे उभे राहू असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
Before You Go
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















